हौशी जलतरणपटूंनी केला क्रीडा अधिकाऱ्यांचा सत्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:57 PM2019-04-06T12:57:49+5:302019-04-06T12:58:24+5:30

अकोला: दुरुस्तीच्या नावाखाली सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीकरिता वसंत देसाई क्रीडांगणातील जलतरण तलाव बंद होता; मात्र उन्हाळ्याची दाहकता वाढल्याने शहरातील एकमेव असलेला हा जलतरण तलाव गुरुवार, ४ एप्रिलपासून नागरिकांसाठी संपूर्ण दुरुस्तीसह खुला करू न दिल्यामुळे हौशी जलतरणपटूंनी शुक्रवारी जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांचा सत्कार केला.

Amateur swimmers felicitated the sports officials! |  हौशी जलतरणपटूंनी केला क्रीडा अधिकाऱ्यांचा सत्कार!

 हौशी जलतरणपटूंनी केला क्रीडा अधिकाऱ्यांचा सत्कार!

Next

अकोला: दुरुस्तीच्या नावाखाली सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीकरिता वसंत देसाई क्रीडांगणातील जलतरण तलाव बंद होता; मात्र उन्हाळ्याची दाहकता वाढल्याने शहरातील एकमेव असलेला हा जलतरण तलाव गुरुवार, ४ एप्रिलपासून नागरिकांसाठी संपूर्ण दुरुस्तीसह खुला करू न दिल्यामुळे हौशी जलतरणपटूंनी शुक्रवारी जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांचा सत्कार केला. त्यावेळी हौशी जलतरणपटूंनी तलावात उतरू न आनंद व्यक्त केला.
श्रीराम ग्रुपच्यावतीने आसाराम जाधव यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी नरेंद्र राठी, हेमेंद्र राजगुरू , डॉ. महेंद्र काळे, डॉ. काटे, डॉ. के. के. अग्रवाल, डॉ. मोदी, डॉ. रवींद्र चौधरी, पवन केडिया, नरेंद्र तापडिया, प्रतीक खिलोसिया, जयेश जगड यांच्यासह सर्व हौशी तरंगपटूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे स्वागत करू न धन्यवाद मानले. जलतरण तलावाचा दर्जा असाच कायम ठेवण्याची अपेक्षाही यावेळी हौशी जलतरणपटूंनी व्यक्त केली. आसाराम जाधव यांनीदेखील जलतरणपटूंच्या समस्यांकडे वेळोवेळी लक्ष देऊन त्या त्वरित सोडविण्याची ग्वाही दिली.
 
‘लोकमत’चे आभार
याप्रसंगी हौशी जलतरणपटूंनी वेळोवेळी तरणतलाव दुरुस्तीविषयी बातम्यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करणाऱ्या लोकमत वृत्तसमूहाचे आभार मानले.
 

 

Web Title: Amateur swimmers felicitated the sports officials!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.