शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर धान्यापासून वंचित ३६ हजार लाभार्थींना वाटप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:49 IST

अकोला : अन्न सुरक्षा कायद्यानुसार ऑक्टोबर २0१६ पासूनच  सार्वजनिक वितरण प्रणालीचे स्वस्त धान्य मिळण्यासाठी पात्र  असलेल्या लाभार्थींना वर्षभर वंचित ठेवण्यात आले.  प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच  चालू महिन्यातच लाभार्थींना धान्य वाटप सुरू करण्यात आले.  त्यानुसार अकोला शहरातील जवळपास ८५६५ शिधापत्रिकांवर  असलेल्या ३६,८३0 लाभार्थींनी धान्याची उचल करावी, असे  आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. 

ठळक मुद्देआठ हजार शिधापत्रिकाधारकांचा समावेशप्रभाव लोकमतचा

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अन्न सुरक्षा कायद्यानुसार ऑक्टोबर २0१६ पासूनच  सार्वजनिक वितरण प्रणालीचे स्वस्त धान्य मिळण्यासाठी पात्र  असलेल्या लाभार्थींना वर्षभर वंचित ठेवण्यात आले.  प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच  चालू महिन्यातच लाभार्थींना धान्य वाटप सुरू करण्यात आले.  त्यानुसार अकोला शहरातील जवळपास ८५६५ शिधापत्रिकांवर  असलेल्या ३६,८३0 लाभार्थींनी धान्याची उचल करावी, असे  आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २0१३ ची राज्या त १ फेब्रुवारी २0१४ पासून अंमलबजावणी सुरू झाली.  त्यानुसार  ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के आणि शहरी भागा तील ४५.३४ टक्के लाभार्थी संख्येला अन्नसुरक्षेचे कवच देण्या त आले. शासनाने १७ डिसेंबर २0१३ रोजीच ही संख्या निश्‍चित  करण्याचा आदेश दिला. त्यानंतर पात्र लाभार्थींची संख्या १३  ऑक्टोबर २0१६ रोजीच्या निर्णयाने बदलण्यात आली. त्यावेळी  अकोला जिल्ह्यात प्राधान्य गटातील २३,४८९ शिधा पत्रिकांमध्ये असलेल्या ११७३४६ लाभार्थींना धान्य सुरू  ठेवण्यात आले, तर ४७,१७२ केशरी शिधापत्रिका असलेल्या  कुटुंबातील २ लाख २९१२१ लाभार्थी वंचित ठेवण्यात आले.  त्या लाभार्थींंपैकी ३६८३0 लाभार्थीं संख्येच्या शिधा पत्रिकाधारकांची निवड करून त्यांना स्वस्त दराने धान्य पुरवठा  सुरू करणे आवश्यक होते. मात्र, वर्षभर लाभार्थी निवड प्रक्रिये तच वेळ दवडण्यात आला. त्यामुळे हजारो लाभार्थींंवर अन्याय  झाला. तसेच अन्नसुरक्षा कायद्यातील तरतुदींची पायमल्ली  करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १९ सप्टेंबर रोजी  प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत शहर अन्नधान्य वितरण  अधिकारी कार्यालयाने दुकानदारांकडून प्राप्त प्रस्तावांना ता तडीने मंजुरी देत, त्यांच्या नावाचे धान्यही मंजूर केले. गोदामातून  त्या धान्याची उचल देण्यात आली. ते धान्य संबंधित लाभार्थींंना  वाटप करण्याचे बजावण्यात आले. 

निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक करणार तपासणीदुकानदारांनी नव्याने पात्र लाभार्थींंच्या नावे उचललेले धान्य  त्यांना मिळाले की नाही, याची पडताळणी करण्याचा आदेश  शहर विभागाचे निरीक्षण अधिकारी अजय तेलगोटे यांच्यासह  पुरवठा निरीक्षक संतोष कुटे, दामोदर यांना देण्यात आला आहे. 

लाभार्थींंनी दुकानांमध्ये पात्रता यादीत नाव असल्याची खात्री  करावी, त्यानंतर दुकानदारांकडून धान्य घेऊन जावे, स्वस्त  धान्य दुकानदारांनी नव्याने पात्र लाभार्थींंची यादी दर्शनी भागावर  पाहण्यासाठी लावून ठेवावी. त्यांची तपासणी केली जाणार आहे. - संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.