शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने प्रस्ताव नाकारल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढणार - अ‍ॅड. आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 13:04 IST

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू अशी घोषणा भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देमतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस सोबत आघाडीचा पर्याय खुला ठेवला आहे.४८ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून राज्यभर दौरे व मेळावे यांचे नियोजन केले असल्याचे ते म्हणाले.

अकोला- वंचित समाज सत्तेत जाऊ शकला नाही. त्यांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळू शकले नाही. या समाजाचा आतापर्यंत वापर करण्यात आला आता वंचीत समाज जागा झाला आहे. महाराष्ट्रात  आम्ही दोन अधिवेशन घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडी स्थापन केली असून धर्मनिरपेक्ष विचारांसोबत निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला आम्ही १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद आला नाही भविष्यात तो न आल्यास महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू अशी घोषणा भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.वंचीत बहूजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.वंचित समाजाला गेल्या ६८ वर्षात न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदतो आहे. सत्तेत गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव वंचितांना व्हायला लागली. सर्वच सत्ता पक्षांनी वापर केला असल्याची जाणीव त्यांना झाली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील वंचित बहुजनांची मुठ बांधून सत्ता संपादनाचा निर्धार केला आहे. त्याअनुषंगाने धनगर समाज व भटक्या विमुक्त समाजाचे दोन अधिवेशन झालीत आहेत. या समाजाची विचारधारा ही धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस सोबत आघाडीचा पर्याय खुला ठेवला आहे. माळी, धनगर, मुस्लीम, भटक्या विमुक्त, ओबीसीमधील अती मागास व मागासवर्गीय अशा जातींना प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून १२ जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे. या मागणीबाबत अजून काँग्रेसकडून कोणतीही चर्चा नाही. काँग्रेसने प्रस्ताव न स्विकारल्यास ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून राज्यभर दौरे व मेळावे यांचे नियोजन केले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघcongressकाँग्रेस