लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : पारस येथील औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी ६६० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प पारस येथेच सुरू करावा, या मागणीने आता जनमानसात चांगलाच जोर धरला आहे. या मागणीला पारस परिसरातील नागरिकांचा जोरदार पाठिंबा असल्याने या प्रकल्पाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी पारस येथे १७ जुलैच्या सायंकाळी ४ वाजता सर्व पक्षीय सुशिक्षित बेरोजगार, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कंत्राटदार संघटना, शेतकरी अभियंता संघटना , संघर्ष समिती, सुशिक्षित बेरोजगार संघटना आदींच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पारस प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी आज सर्वपक्षीय सभा
By admin | Updated: July 16, 2017 20:39 IST