शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीटाकळी येथे २४ जानेवारीपासून अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 15:42 IST

अकोला : देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन वर्षात बार्शीटाकळी येथे २४ ते २७ जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे.

अकोला : देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन वर्षात बार्शीटाकळी येथे २४ ते २७ जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली असून, नेते, अभिनेते आणि नामवंत या स्पर्धेला हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मधुकर पवार यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली. श्री मधुकर पवार क्रीडा व बहूद्देशीय मंडळ यांच्यावतीने २४, २५, २६ आणि २७ जानेवारी २०१९ यादरम्यान गुलाम नबी आझाद महाविद्यालय बार्शीटाकळी येथील प्रांगणावर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा होणार आहेत. देशातील १७ राज्यांतील नामवंत कबड्डी चमू या स्पर्धेत सहभागी होणार असून, पुरुषांच्या २४ आणि महिलांचे १६ कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेले केळीवेळी हे गाव ज्या जिल्ह्यात आहे, त्याच अकोला जिल्ह्याला अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आयोजनाचा मान दुसºयांदा आणि बार्शीटाकळी या अविकसित तालुक्याला प्रथमच मिळाला असून, आयोजन दिमाखदार आणि भव्य-दिव्य होऊन जिल्ह्याचा नावलौकिक वाढावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी नेते, अभिनेते आणि प्रख्यात व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे डॉ. मधुकर पवार यावेळी म्हणाले.स्पर्धा नीटनेटक्या आणि शिस्तबद्ध व्हाव्यात, यासाठी आयोजन समितीने २० विविध समित्या तयार केल्या असून, गुलाम नबी आझाद महाविद्यालय बार्शीटाकळी येथे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या स्पर्धेतील विजेते आणि उत्कृष्ट कबड्डीपटू यांच्यावर बक्षिसांची लयलूट होणार आहे. प्रथम येणाºया पुरुष व महिला संघाला १ लाख ५१ हजार रुपये रोख आणि शील्ड, द्वितीय संघाला ७१ हजार रोख आणि शील्ड, तर तृतीय संघाला ५१ हजार आणि शील्ड देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड अशी वैयक्तिक बक्षिसे पुरुष आणि महिला संघातील खेळाडूंना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेला अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेवराव नेरकर, आयोजन समितीचे खजीनदार प्रा. डॉ. संतोष हुशे, आयोजन समितीचे सचिव डॉ. मुकुंदराव खुपासे, उमाकांत कवडे, रामभाऊ अहिर, बंडू खुमकर, नरेश रणधीर, रवी सुरोसे व सय्यद मकसुद उपस्थित होते.

पुरुषांच्या बरोबरीने महिला संघांना बक्षीसकबड्डी स्पर्धेच्या आजपर्यंतच्या इतिहासात पुरुषांच्या तुलनेने महिला संघांना अतिशय कमी रकमेचे बक्षीस आयोजकांच्यावतीने दिले जातात; परंतु बार्शीटाकळी येथे होणाऱ्या या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच महिला संघांना पुरुषांच्या बरोबरीने बक्षिसांची रक्कम मिळणार असल्याचे प्रमुख आयोजक प्राचार्य मधुकर पवार यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना घोषणा केली.

टॅग्स :AkolaअकोलाKabaddiकबड्डीBarshitakliबार्शिटाकळी