घुंगशी बॅरेजचे सर्व गेट उघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 11:07 AM2020-07-26T11:07:49+5:302020-07-26T11:07:59+5:30

‘घुंगशी बॅरेज’चे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

All the gates of Ghungshi Barrage opened! | घुंगशी बॅरेजचे सर्व गेट उघडले!

घुंगशी बॅरेजचे सर्व गेट उघडले!

Next

मूर्तिजापूर : सातत्याने पूर्णा नदीला येत असलेला पूर लक्षात घेता पाणी अडवून नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘घुंगशी बॅरेज’चे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
१७.४५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण असलेले घुंगशी बॅरेज थोड्या पावसातच साठवण क्षमता ओलांडत असल्याने नदीला येणाऱ्या पुराचा ओघ पाहून पाण्याची साठवणूक करावी लागते; परंतु पूर्णा नदीला सात्यत्याने पूर येत असल्यामुळे १६ जूनपासून सर्वच १० दरवाजे उघडण्यात आले आहेत.
या बॅरेजच्या पसाºयानुसार घुंगशीपासून ते नेर घामणापर्यंत गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यात आतापर्यंत ५७०.८ मिलीमीटर एवढे पर्जन्यमान झाले, तर शनिवारी ६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्णा नदी भरभरून वाहत असल्याने संपूर्ण जलसाठा करणे शक्य नाही. पहिल्याच पावसात ११ जून रोजी ४५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. दरम्यान, १२ जूनला जोरदार पाऊस झाल्याने १३ जून रोजी गेट एक-एक करून उघडण्यात आले. जलसाठा वाढत असल्याने १६ जून रोजी संपूर्ण १० गेट पूर्णपणे उघडण्यात आले होते. तेव्हापासून पावसाचा व पुराचा ओघ सारखा असल्याने संपूर्ण गेट उघडेच ठेवण्यात आले आहे.
या संदर्भात नदी काठावरील गावांना व मच्छीमारी करणाऱ्यांना नदीपात्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत ४ गेटमधून दीड मीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. (शहर प्रतिनिधी)

घुंगशी बॅरेजचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले आहे. पहिल्याच पावसात बॅरेजमध्ये ८० टक्के साठा जमा झाल्याने २० टक्के गेट उघडण्यात आले होते. आता संपूर्ण गेट उघडे असले, तरी नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- संजय पाटील, उपविभागीय अभियंता, घुंगशी बॅरेज

Web Title: All the gates of Ghungshi Barrage opened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.