शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील बीटकॉइनच्या सटोडियांसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 14:14 IST

अकोला: आभासी चलन असलेल्या बीटक्वाइनच्या सट्टाबाजारातील फसवणुकीला सुरुवात झाली असून, बीटकॉइनवर दररोजची लक्षावधींची उलाढाल करणाºयांसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे.

- संजय खांडेकरअकोला: आभासी चलन असलेल्या बीटक्वाइनच्या सट्टाबाजारातील फसवणुकीला सुरुवात झाली असून, बीटकॉइनवर दररोजची लक्षावधींची उलाढाल करणाºयांसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. नागपुरात ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेत. तसे प्रकार आता अकोल्यात उघड होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने बीटकॉइनचा सट्टाबाजार खेळणाºयांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.युनायटेड स्टेटमध्ये डिजिटल चलन, आभासी मुद्रा म्हणून बीटकॉइन सट्टाबाजार जगभरात ओळखल्या जात आहे. आॅनलाइन सट्टाबाजारातील बीटक्वॉइनमुळे एका कॉइनचे दर अलीकडे पावणेपाच ते सव्वापाच लाखांवर पोहोचले आहे. हे दर काही वर्षांआधी एका लाखांच्या आत होते. त्यामुळे झटपट श्रीमंतीकडे तरुण वर्गाचा जास्त कल आहे. बीटकॉइन खरेदी करताना भारतीय मुद्रा मोजाव्या लागतात; मात्र विक्रीच्या वेळी खरेदीदार किंवा संबंधित ठरावीक जागतिक ब्रॅण्डच्या वस्तूंचीच खरेदी कराव्या लागतात. यामध्ये फसवणुकीचे प्रकार होत असून, नागपूरमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. नागपूरच्या धर्तीवर अकोल्यातही असे प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जगभरातून मागणी वाढल्याने बीटकॉइनचे भाव वधारले असून, अनेक देशांची अर्थव्यवस्था त्याभोवती फिरू लागली आहे. या आभासी मुद्रा चलनात चीन आणि इतर देशांनी उडी घेऊन क्राप्टो आणि एलएफसी नावाचे वेब क्वाइन बाजारपेठेत आले आहे. पॅनकार्ड किंवा पासपोर्ट क्रमांकावर ही नोंदणी होत असली, तरी याला भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत बीटकॉइनचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले असून, कोट्यधीश होण्याच्या आमिषाला शेकडो युवक बळी पडत आहे. अकोल्यासारख्या ठिकाणी या दोन्ही कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये शेकडो युवक जोडले गेले असून, बीटकॉइनवर कोट्यवधींची उलाढाल होत आहे. बीटकॉइनच्या खरेदी-विक्रीतून आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा नागपुरात दाखल झाल्याने आता बीटकॉइनचा सट्टाबाजार खेळणाºयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर