शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोट तालुका कृषी अधिकाऱ्यासह तीघे ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 18:40 IST

अकोला: आकोट तालुक्यातील कृषी विभागातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामाचे तब्बल ११ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी खासगी कंत्राटदाराकडून सुमारे एक लाख ६० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या आकोटचा तालुका कृषी अधिकारी मंगेश अरुण ठाकरे, कृषी साहायक वनमाला भास्कर व तीचा पती प्रभुदास सुरत्ने या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने शनिवारी अटक केली.

ठळक मुद्देआकोट तालुक्यात खासगी कंत्राटदाराने २०१७ मध्ये कृषी विभागातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट नाला बांध खोलीकरणाची कामे केली. कामाचे तब्बल ११ लाख रुपयांचे देयक निघत नसल्याने खासगी कंत्राटदार हैरान झाले होते. या संदर्भात कंत्राटदाराने अकोटचा तालुका कृषी अधिकारी मंगेश अरुण ठाकरे याच्याशी संपर्क साधून देयक काढण्यासाठी विनंती केली,

अकोला: आकोट तालुक्यातील कृषी विभागातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामाचे तब्बल ११ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी खासगी कंत्राटदाराकडून सुमारे एक लाख ६० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या आकोटचा तालुका कृषी अधिकारी मंगेश अरुण ठाकरे, कृषी साहायक वनमाला भास्कर व तीचा पती प्रभुदास सुरत्ने या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने शनिवारी अटक केली. या तिघांकडून ६० हजार रुपये रोख व एक लाख रुपयांचा धनादेश जप्त करण्यात आला आहे.आकोट तालुक्यात खासगी कंत्राटदाराने २०१७ मध्ये कृषी विभागातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट नाला बांध खोलीकरणाची कामे केली. नियमानुसार ई-निवीदा सादर केल्यानंतर त्यांनी कंत्राट मिळविला व त्यानंतर अटींच्या अधीन राहून ही कामे केली. मात्र कामाचे तब्बल ११ लाख रुपयांचे देयक निघत नसल्याने खासगी कंत्राटदार हैरान झाले होते. या संदर्भात कंत्राटदाराने अकोटचा तालुका कृषी अधिकारी मंगेश अरुण ठाकरे याच्याशी संपर्क साधून देयक काढण्यासाठी विनंती केली, मात्र त्याने कृषी साहायक वनमाला उत्तमराव भास्कर उर्फ वनमाला प्रभुदास सुरत्ने (२२) रा. भवानीविहार आकोट व तीचा पती प्रभुदास कडूजी सुरत्ने (३५) रा. भवानीविहार आकोट यांच्यामार्फत तब्बल एक लाख ६० हजार रुपयांची लाच मागीतली. मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली. यावरुन एसीबीच्या अधिकाºयांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता तीनही आरोपींनी एक लाख ६० हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शनिवारी एक लाख रुपयांचा धनादेश व ६० हजार रुपये रोख घेउन या तिघांनी कंत्राटदाराला बोलावले. कंत्राटदाराने ही रक्कम व धनादेश कृषी अधिकारी ठाकरे, वनमाला भास्कर व तीचा पती प्रभुदास सुरत्ने या तिघांच्या हातात देताच सापळा रचून असलेल्या एसीबीने या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता या तिघांकडून एक लाख रुपयांची रक्कम लिहीलेला धनादेश व रोख ६० हजार रुपये जप्त करण्यात आले. या तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग