शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

रस्ता वाहून गेल्याने अकोट-शेगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:12 IST

सोमवारी संततधार पावसामुळे मोहाडी नदीला पूर येऊन यामध्ये शेगाव-अकोट महामार्गावरील पाटसूल फाटा ते आलेवाडी दरम्यानचा रस्ता वाहून गेला.

नया अंदुरा : अकोट-शेगाव रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. या मार्गावर अनेक पुलाचे निर्माण कार्य सुरू असलेल्या ठिकठिकाणी पर्यायी पूल संबंधित कंपनीने तयार केले नाहीत. सोमवारी संततधार पावसामुळे मोहाडी नदीला पूर येऊन यामध्ये शेगाव-अकोट महामार्गावरील पाटसूल फाटा ते आलेवाडी दरम्यानचा रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.अकोट ते शेगाव मार्गावर पुलाचे बांधकाम चालू असताना कोणत्याही पर्यायी पुलाची व मार्गाची व्यवस्था केलेली नाही. यामुळे पुलाजवळील पर्यायी रस्ता खचल्याने २४ तासांपासून अकोट-शेगाव महामार्ग बंद पडला आहे. शेगाव ते अकोट महामार्गाची कामे सुरू आहेत. संबंधित कंत्राटदाराने कोणतेही नियोजन न करता पुलाची कामे सुरू केल्याने बाजूने काढलेले रस्ते खचत असल्याने तसेच खोदून ठेवल्याने दर पावसाळ्यात वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. महामार्गावरील अनेक पुलांची निर्माण कार्य सुरू असल्यामुळे पर्यायी पुलाजवळील रस्ता अरुंद आहेत. तसेच पावसामुळे रस्ता खचल्याच्या भीतीमुळे अकोट-शेगाव महामार्गावरील एसटी महामंडळाची बस गेल्या २५ ते ३० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटRainपाऊस