शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांची लाच घेताना अकोट पंचायत समितीचा लाचखोर कंत्राटी सहायक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:50 IST

अकोला : अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक शिवकुमार भोरेअकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी लाच घेताना रंगेहाथ अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.अकोट तालुक्यातील एका शेतकर्‍यास सिंचन विहीर मंजूर झालेली आहे. त्यांनी विहिरीचे काम पूर्ण केल्यानंतर झालेल्या कामाची देयके व मजुरांचे वेतन मिळण्यासाठी तसेच अंदाजपत्रक पुनर्मूल्यांकन करण्यासाठी यासोबतच मस्टर रजिस्टर तपासण्यासाठी अर्ज केला होता. यावर अकोट पंचायत समितीचा लाचखोर कंत्राटी तांत्रिक सहायक शिवकुमार ज्ञानेश्‍वर भोरे याने शेतकर्‍याला दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात २ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक भोरे याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी अकोटातील एका खासगी हॉटेलमध्ये लाचेची रक्कम घेऊन भोरे याने  शेतकर्‍यास बोलावले. त्यानंतर शेतकर्‍याने दोन हजार रुपयांची रक्कम देताना शिवकुमार भोरे या लाचखोर कर्मचार्‍यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई अकोला एसीबीचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात गाडगे, सुनील राऊत यांनी केली. 

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटक