शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अकोट : व्यापार्‍यांच्या खराब उडिदाची प्रतवारी फेडरेशनने सुधारली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:09 IST

अकोला : अकोट खरेदी केंद्रावर व्यापार्‍यांकडून खरेदी केलेला निकृष्ट उडीद गोदामात आणल्यानंतर त्याची प्रतवारी सुधारण्याचा आदेश चक्क महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयातील अधिकार्‍याने दिल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देव्यापार्‍यांच्या उडिदासाठी मार्केटिंग फेडरेशनची सारवासारव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट खरेदी केंद्रावर व्यापार्‍यांकडून खरेदी केलेला निकृष्ट उडीद गोदामात आणल्यानंतर त्याची प्रतवारी सुधारण्याचा आदेश चक्क महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयातील अधिकार्‍याने दिल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. हा प्रकार व्यापार्‍यांकडून खरेदी केलेल्या उडीदप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी केला जात आहे, अशी तक्रार अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पुंडकर यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे. खासगी व्यापार्‍यांकडून होणारी शेतकर्‍यांची लूट थांबवण्यासाठी शासनाने हमीभावाने मूग, उडिदाची ऑनलाइन खरेदी प्रक्रिया ३ ऑक्टोबरपासून सुरू केली. जिल्हय़ात पणन महासंघाने अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या चार केंद्रांवर  मूग, उडीद खरेदीची सोय केली. नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा एफएक्यू दर्जाचा मूग, उडीद खरेदी केला जातो. त्याचवेळी नाकारलेला माल परत न्यावा लागतो. अकोट खरेदी-विक्री संस्थेच्या केंद्रात शेतकर्‍यांनी आणलेला उडीद केंद्रातील ग्रेडर्सनी नाकारला. त्यामुळे शेतकर्‍यांनी तो खासगी व्यापार्‍यांना विकला. त्यावेळी व्यापार्‍यांनी त्यांच्याकडून सात-बाराच्या प्रतीही घेतल्या. त्याआधारे व्यापार्‍यांनी तोच उडीद नंतर शासनाच्या खरेदी केंद्रात विक्री केला. त्या हजारो क्विंटल उडिदाचा साठा वखार महामंडळाच्या गोदामात करण्यासाठी अकोला येथे वाहनाद्वारे पाठविण्यात आला. त्या ठिकाणी वखार महामंडळाच्या ग्रेडर्सनी उडीद एफएक्यू दर्जाचा नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांना कळवत नाकारला. त्यावर अकोट खरेदी-विक्री केंद्रातील संबंधित ग्रेडर्सना याबाबत जाब विचारण्याची नोटीसही तत्कालिन मार्केटिंग अधिकारी जे.एन. मगरे यांनी बजावली. तसेच उडीद अकोटला परत करण्यात आला. तो उडीद अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती रोडवर अनेक दिवस पडून होता. गेल्या १५-२0 दिवसांत अकोला येथे नेण्यात आला. जवळपास २९00  क्विंटल खराब असलेल्या उडिदावर प्रक्रिया करून वखारच्या गोदामात जमा करण्यात आला. तसेच उडिदाची रक्कमही अदा करण्यात आली. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी तराळ यांना विचारणा केली असता त्यांनी फेडरेशनच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी हनुमंत पवार यांच्या आदेशाने उडीद जमा केल्याचे सांगितले. शेतकर्‍यांचा मूग, उडीद खरेदी करण्यासाठी २0 जानेवारीपर्यंतची मुदत असतानाही त्याचा शेतकर्‍यांना कोणताच फायदा झाला नाही. त्याउलट व्यापार्‍यांना हाताशी धरून भ्रष्टाचार करण्यात आला, या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी पुंडकर यांनी तक्रारीत केली आहे. 

टॅग्स :akotअकोटMarket Yardमार्केट यार्ड