लोकमत न्यूज नेटवर्कदहीहांडा/अकोट : देवरी ते शेगाव रस्त्यावर आलेवाडी गावाजवळ ५ फेब्रुवारीच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास कापूस भरलेले मिनीट्रक वेगात धावत असताना चालकाचे नियंत्रण सुटून उलटला. या मिनीट्रकखाली दबून एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे.एम.एच. ४३ एफ ५७१ क्रमांकाचा कापूस भरलेला मिनीट्रक पंचगव्हाण येथून कापूस भरून सोमवारी दुपारी अकोटकडे वेगाने जात असताना आलेवाडी गावाजवळ मिनी ट्रक उलटला. या अपघातात ट्रकच्या केबीनच्या टपावर बसून प्रवास करीत असलेला कापूस व्यापारी अबरारखॉं कय्युमखॉं जागीच ठार झाला. तसेच अब्दुल साजीद अब्दुल हक हा इसम गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने अकोल्याला नेण्यात आले. या ट्रकचा चालक स्वत:हून अकोट पोलीस स्टेशनमध्ये शरण गेला असल्याचे समजले आहे. या अपघाताबाबत अफजलखॉ आसीफखॉ यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून दहीहांडा पोलिसांनी सदर ट्रकचालकाविरुद्ध भा.दं.वि.च्या २७९, ३३७, ३0४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल महाजन, तेलगोटे, पोलीस कॉन्स्टेबल डाबेराव करीत आहेत.
अकोट : आलेवाडी गावाजवळ मालवाहू वाहन उलटून एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:55 IST
लोकमत न्यूज नेटवर्कदहीहांडा/अकोट : देवरी ते शेगाव रस्त्यावर आलेवाडी गावाजवळ ५ फेब्रुवारीच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास कापूस भरलेले मिनीट्रक वेगात धावत असताना चालकाचे नियंत्रण सुटून उलटला. या मिनीट्रकखाली दबून एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे.एम.एच. ४३ एफ ५७१ क्रमांकाचा कापूस भरलेला मिनीट्रक पंचगव्हाण येथून कापूस ...
अकोट : आलेवाडी गावाजवळ मालवाहू वाहन उलटून एक ठार, एक गंभीर
ठळक मुद्दे देवरी ते शेगाव रस्त्यावर आलेवाडी गावाजवळ ५ फेब्रुवारीच्या दुपारी ३ वाजता घडला अपघात