अकोटच्या दिव्यांग धिरज कळसाईत केले सह्याद्री पर्वतरांगेतील कळकराई शिखर सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 06:40 PM2018-12-02T18:40:51+5:302018-12-02T18:42:20+5:30

अकोला : दिव्यांग असून अकोटच्या धिरज कळसाईत या तरूणाने गिर्यारोहणात अनोखा विक्रम करून अकोल्याचा गौरव वाढविला आहे.

 Akot Boy trek on Kalakrai peak in Sahyadri mountain range | अकोटच्या दिव्यांग धिरज कळसाईत केले सह्याद्री पर्वतरांगेतील कळकराई शिखर सर

अकोटच्या दिव्यांग धिरज कळसाईत केले सह्याद्री पर्वतरांगेतील कळकराई शिखर सर

Next
ठळक मुद्देकळसुबाई शिखर, लिंगाणा, पावनखिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड अशा शिखरावर यशस्वी गिर्यारोहण केले आहे. त्याने रविवारी कलाकराई हे शिखर सर करून नवा विक्रम केला आहे. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत त्याने ही कामगीरी केली आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : दिव्यांग असून अकोटच्या धिरज कळसाईत या तरूणाने गिर्यारोहणात अनोखा विक्रम करून अकोल्याचा गौरव वाढविला आहे. यापूर्वी
सह्याद्री पर्वतरांगेतील राजगड व तोरणा यांच्यामध्ये असलेले खडतर असे ९५० मीटर उंचीचे लिंगाणा हा शिखर आहे; कळसुबाई शिखर, लिंगाणा, पावनखिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड अशा शिखरावर यशस्वी गिर्यारोहण केले आहे. त्याने रविवारी कलाकराई हे शिखर सर करून नवा विक्रम केला आहे. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत त्याने ही कामगीरी केली आहे.
चिंचवड (पूणे) येथील शिखर फाऊंडेशन या अडव्हेंचर क्लब च्या वतीने सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील पुणे आणि रायगड च्या सीमेवर असलेल्या ढाकभैरी किल्ल्याच्या शेजारी ‘कळकराई’ नावाचा सरळ सुळका आहे. तब्बल १८० फूट उंच असलेल्या या सुळक्यावर एक हात आणि एक पाय नसलेल्या दिव्यांग धिरज कळसाईत सह चमुने यशस्वी चढाई करून दिमाखात तिरंगा फडकवला.
शिखर फाऊंडेशन चे आघाडीचे गियार्रोहक संजय बाठे यांच्या नेत्रत्वाखाली भल्या पहाटे 25 जणांच्या चमूने कामशेत जवळील कोंढेश्वर च्या दिशेने प्रस्थान ठेवले. कोंढेश्वर मंदिराजवळ गाड्या पार्क करून , हुडहुडी भरणा?्या थंडीतच टीम ने ढाकभैरी च्या दिशेने कूच केली . साधारण एक तासाच्या पायपिटी नंतर टीम कळकरायच्या पायथ्याला पोहचली. कळकराय सुळक्याची विधिवत पूजा करून गणपती बप्पा मोरया ! जय भवानी ! जय शिवाजी ! च्या जय घोषात सकळी ९ वाजता चढाईला सुरुवात झाली. आघाडीचा गियार्रोहक म्हणून या वेळेस प्रथमच मयुर देशपांडे यांना संधी देण्यात आली . मुयर चा सुरक्षा दोर अनुभवी प्रविण पवार यांनी सांभाळला . कोंबडी पॅच म्हणून ओळखल्या जाणा?्या स्टेशन पर्यंतची चढाई मयूर ने लिलाय पार केली . त्यानंतर कोंबडी पॅच वर आवश्यक ती तयारी करत मयूर ने प्रविण च्या मार्गदर्शनाखाली यशस्वी चढाई केली. त्या नंतर प्रविण पण मयूर च्या पाठीमागे वर सरकला. त्यानंतत शिवाजी आंधळे यांनी थर्ड मॅन ची जवाबदारी स्वीकारत कोंबडी पॅच पार केला . विजय समीप दिसताच मयुरने शेवटची चढाई धैर्यपूर्वक करत सकाळी 11 वाजता कळकराय च्या माथ्यावर पाऊल ठेवत , सह्याद्रीची शांतता भंग करत आकाशाला छेद देणारी शिवगर्जना देत आसमंत दुमदुमून टाकला.या नंतर वेळ होती ती ; अपघातात एक हात आणि एक पाय गमावलेल्या दिव्यांग धिरज कळसाईत ची. सर्व टीम ने धिरज चे मनोधैर्य उंचावत त्याला बॅकअप करत चढाईला सुरुवात केली . सर्वसामान्य गियार्रोहकाला लाजवेल अशा थाटात धिरज ने चढाई सुरू केली. टाळ्यांच्या कडकडाटात आणि जय भवानी ! जय शिवाजी ! च्या जय घोषात धिरज ने कोंबडी पॅच पार केला . त्यानंतर ना थांबता पुढची चढाई पण धिरज ने पार केली आणि विजेत्यांचा थाटातच कळकराई वर पाऊल ठेवले . वर प्रवीण आणि शिवाजी ने त्याला आलिंगन देत त्याचे अभिनंदन केले. या नंतर धिरज च्या पाठोपाठ रवि मोरे , प्रकाश गोरडे , शुभम , सुशांत , सुधीर गायकवाड , प्रतीक मोरे , जय देशमुख , बंटी देशमुख , शरद महापुरे , तान्हाजी आणि उर्वरित टीम ने दुपारी 2 वाजेपर्यत चढाई पूर्ण केली. त्यानंतर रॅपलिंग चा थरार अनुभवत सुळक्याच्या पायथा गाठला.

 

Web Title:  Akot Boy trek on Kalakrai peak in Sahyadri mountain range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.