शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर अकोलेकरांचे नळ कनेक्शन होतील बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:36 IST

अकोला: पाण्याची नासाडी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देअकोलेकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात अवघा साडेसात टक्के जलसाठा शिल्लक आहे.मनपाच्या जलप्रदाय विभागाने अकोलेकरांना दर आठव्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. नळाला तोट्या न लावण्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.

अकोला: महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून आठ दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. आठव्या दिवशी नळाला पाणी आल्यानंतरसुद्धा बहुतांश नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र समोर येत आहे. नळाला तोट्या न लावणे, अंगणात पाणी शिंपडणे, दुचाकी-चारचाकी वाहने धुण्यासारखे प्रकार होत आहेत. अशा प्रकारे पाण्याची नासाडी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे.अकोलेकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात अवघा साडेसात टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे धरणातील जलसाठ्यात किंचितही वाढ झाली नाही. उपलब्ध जलसाठा लक्षात घेता मनपाच्या जलप्रदाय विभागाने अकोलेकरांना दर आठव्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तसेच जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाण्याच्या नासाडीला लगाम घातला. उन्हाची दाहकता व शहरावरील संभाव्य पाणी टंचाई पाहता महापालिका प्रशासनाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. आठव्या दिवशी नळाला पाणी आल्यानंतरही काही सुज्ञ व स्वत:ला प्रतिष्ठित म्हणवून घेणारे नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. नळाला तोट्या न लावण्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. अंगणात पाणी शिंपडणे, दुचाकी-चारचाकी वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जात असल्याचे चित्र समोर आल्यानंतर आता प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून शहरातील ज्या भागात पाणी पुरवठा केला जाईल, त्या भागात नळ तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. पाण्याची नासाडी करणाºया नागरिकांचे नळ कनेक्शन बंद केले जातील.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाWaterपाणी