शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जलजागृतीसाठी चालले अकोलेकर; ‘वॉटर रन’ला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 17:33 IST

अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातुन एका भव्य ‘वॉटर रन’चे आयोजन करण्यात आले. या ‘वॉटर रन’चा शुभारंभ पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन केला.

ठळक मुद्देया ‘वॉटर रन’चा शुभारंभ पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन केला.अशोक वाटीका मार्गे निघून अधिक्षक अभियंता अकोला पाटबंधारे मंडळ येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. पाणी वाचवा देश वाचवा’ या सारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

अकोला: राज्यात १६ ते २२ मार्च २०१८ दरम्यान जलसंपदा व पाटबंधारे विभागामार्फत पाणी बचतीचे महत्व पटविण्यासाठी जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्य रविवार, १८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातुन एका भव्य ‘वॉटर रन’चे आयोजन करण्यात आले. या ‘वॉटर रन’चा शुभारंभ पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे, अकोला पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.वॉटररनची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून झाली. अशोक वाटीका- नविन बस स्थानक- टॉवर चौक ते पुन्हा नवीन बस स्थानक -अशोक वाटीका मार्गे निघून अधिक्षक अभियंता अकोला पाटबंधारे मंडळ येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या वॉटररनच्या पुढे जलजागृतीचे संदेश देणारे फलक शेकडोंच्या हातात होते . ‘जल है, तो कल है’, ‘पाण्याची बचत काळाची गरज’ , ‘पाणी वाचवा देश वाचवा’ या सारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संपुर्ण शहर जलजागृती साठी सज्ज झाल्याचे दिसुन येत होते.पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब अडवून जमीनीत मुरविने आवश्यक आहे. भवीष्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे यासाठी जलजागृती करणे जलसंर्वधन करणे तसेच असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी जल शपथ’ घेण्यात आली. पाण्याच्या योग्यवापर विषयक जनजागृती एक लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई व व सुत्र संचालन अरविंद भोंडे यांनी केले.या वॉटररनमध्ये पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासन तसेच विविध विभागाचे अधिकारी/ कर्मचारी नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय