लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येते. त्यानिमित्ताने मंगळवारी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगणावर सकाळी ७.३0 वाजता करण्यात आले. या एकता दौडला हिरवी झेंडी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दाखविली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम मान्यवरांनी भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार संजय धोत्रे म्हणाले, की लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश अखंड राखण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमामुळे आपला देश अखंड आहे. देशाची सामाजिक एकता राखण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाची आठवण म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.दौडच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय म्हणाले, की विविधतेमध्ये एकता हा भारताचा मूलमंत्र आहे. वेगवेगळे धर्म, जात, भाषा, असूनसुद्धा या देशातील नागरिक एकत्र आहेत, हीच आपली विशेषत: आहे. आपल्या देशातील नागरिकांमध्ये कोणतीही गोष्ट सहन करण्याची शक्ती तसेच ऐकण्याची व जोपासण्याची क्षमता असल्यामुळे आपली एकता आबाधित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.वसंत देसाई येथून सुरू झालेली दौड टॉवर चौक, जुने बसस्थानक मार्ग, फतेह चौक, संतोषी माता चौक परत वसंत देसाई स्टेडियम येथे दौडचा समारोप झाला. या दौडमध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, नेहरू युवा केंद्राचे हरिहर जिराफे, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) शेलार, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णीसह विविध शाळेचे विद्यार्थी, आयएमएचे डॉक्टर्स, खेळाडू यांनी सहभाग घेतला. संचालन क्रीडा अधिकारी देशपांडे, आभार समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.
सामाजिक एकतेसाठी अकोलेकर पुढे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:13 IST
अकोला : भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येते. त्यानिमित्ताने मंगळवारी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगणावर सकाळी ७.३0 वाजता करण्यात आले.
सामाजिक एकतेसाठी अकोलेकर पुढे!
ठळक मुद्देराष्ट्रीय एकता दौडखासदार, जिल्हाधिकार्यांनी दाखविली हिरवी झेंडी