शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा बोजवारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:51 IST

अकोला : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्हय़ात ३ हजार ५00 शेततळी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, गत ऑक्टोबर अखेरपर्यंत  जिल्हय़ात केवळ ६४८ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आली आहेत. त्यामुळे जिल्हय़ात शेततळी कामांचा बोजवारा उडाल्याची बाब समोर येत आहे.

ठळक मुद्देकामात दिरंगाई महसूल, कृषी मंडळ अधिकार्‍यांना ‘शो-कॉज’

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्हय़ात ३ हजार ५00 शेततळी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, गत ऑक्टोबर अखेरपर्यंत  जिल्हय़ात केवळ ६४८ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आली आहेत. त्यामुळे जिल्हय़ात शेततळी कामांचा बोजवारा उडाल्याची बाब समोर येत आहे. त्यानुषंगाने शेततळ्यांच्या कामांसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्याच्या कामात दिरंगाई करणार्‍या अकोला तालुक्यातील ९ महसूल मंडळ अधिकारी आणि ३ कृषी मंडळ अधिकार्‍यांना तहसीलदारांनी १0 नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावली आहे.शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत सन २0१६-१७ व २0१७-१८ या दोन वर्षात जिल्हय़ात ३ हजार ५00 शेततळी करण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानुषंगाने गत ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्हय़ात शेततळ्यांच्या कामांसाठी २ हजार ९६५ शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्दिष्टाच्या तुलनेत गत वर्षभराच्या कालावधीत जिल्हय़ात केवळ ६४८ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित शेततळ्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे उद्दिष्टाच्या तुलनेत शेततळ्यांच्या कामांसाठी शेतकर्‍यांकडून ऑनलाइन अर्ज प्राप्त होणार की नाही आणि शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर शेततळ्यांच्या कामांसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्याच्या सूचना अकोला उपविभागीय अधिकार्‍यांकडून तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायकांना देण्यात आल्या होत्या; परंत यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अद्याप सादर केला नसल्याने, शेततळ्यांच्या कामात दिरंगाई करणार्‍या तालुक्यातील ९ महसूल मंडळ अधिकारी व ३ कृषी मंडळ अधिकार्‍यांना अकोला तहसीलदारांनी १0 नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शेततळ्यांसाठी शेतकर्‍यांच्या अर्जाची यादी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आणि स्पष्टीकरण तातडीने सादर करण्याचे निर्देशही नोटीसमध्ये देण्यात आले.

जिल्हय़ातील शेततळ्यांच्या कामांवर दृष्टिक्षेप!२0१६-१७ व २0१७-१८ मध्ये शेततळ्यांचे उद्दिष्ट : ३५00शेतकर्‍यांकडून ऑनलाइन प्राप्त अर्ज : २९६५कार्यारंभ आदेश दिलेली कामे : १५१८पूर्ण करण्यात आलेली कामे   :  ६४८अनुदान वाटप करण्यात आलेले शेतकरी :  ६३२अनुदान वाटपापोटी खर्च झालेला निधी : २.९५ कोटी

शेततळ्यांच्या कामांसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्याच्या कामात दुर्लक्ष करणार्‍या अकोला तालुक्यातील ९ महसूल मंडळ अधिकारी आणि ३ कृषी मंडळ अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.- राजेश्‍वर हांडे, तहसीलदार, अकोला. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणWaterपाणी