शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

अकोल्यात कडकडीत बंद : दगडफेक, तोडफोड, अन् घोषणाबाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:19 IST

अकोला : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बुधवारी    भारिप-बमसं, डावे पक्ष तसेच आंबेडकरी विचारधारेच्या संघटनांनी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी जनतेसह भारिप-बमसंचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर उतरले. कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध शांततेने करीत असताना, दुपारी शहरातील काही भागात संतप्त युवकांनी तुरळक दगडफेक केली. वाहनांच्या काचा फोडल्या. भारिपच्या जिल्हा बंदच्या आवाहनामुळे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. 

ठळक मुद्देशाळा, महाविद्यालये दुकाने बंदप्रवासी वाहतूक ठप्प, ऑटोही तुरळक पेट्रोल पंप बंद, कार्यालयांमध्ये शुकशुकाट 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बुधवारी भारिप-बमसं, डावे पक्ष तसेच आंबेडकरी विचारधारेच्या संघटनांनी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी जनतेसह भारिप-बमसंचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर उतरले. कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध शांततेने करीत असताना, दुपारी शहरातील काही भागात संतप्त युवकांनी तुरळक दगडफेक केली. वाहनांच्या काचा फोडल्या. भारिपच्या जिल्हा बंदच्या आवाहनामुळे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. कोरेगाव भीमा घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवार सकाळपासून आंबेडकरी कार्यकर्ते गटागटाने रस्त्यावर उतरले. काही युवकांनी मोटारसायकल रॅली काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. शहरातील जठारपेठ, राऊतवाडी, लहान उमरी, मोठी उमरी, परिसरातील शेकडो युवकांनी मोटारसायकल रॅली काढली. मोटारसायकलवर फिरून युवक सुरू असलेले दुकाने बंद करताना दिसून येत होते. युवकांचे वेगवेगळे गट सिव्हिल लाइन चौकात गोळा होऊन मोठय़ा संख्येने मुख्य डाकघर चौकाजवळ आले. या ठिकाणी युवकांनी घोषणा दिल्या. त्यानंतर युवकांचा मोर्चा टॉवर चौकातून मार्गक्रमण करीत मोहम्मद अली चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोरील जयप्रकाश नारायण चौकात आला. त्यानंतर हे युवक अशोक वाटिका येथे आले. या ठिकाणी हजारो युवक, महिला व पुरुष गोळा झाले. हा जमलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हाधिकारी चौकात आल्यावर या ठिकाणी युवकांनी नारेबाजी केली. 

‘रिपाइं’ने काढला मोर्चा!कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) आठवले गट शहर शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील वाशिम रोड बायपासस्थित पक्षाच्या कार्यालयापासून निघालेला मोर्चा हरिहरपेठ, जयहिंद चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, कापड बाजार, गांधी रोड, बसस्थानक, अशोक वाटिका मार्गे मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. घटनेचा निषेध करीत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. मोर्चात रिपाइं (ए) चे महानगराध्यक्ष गजानन कांबळे, रोहित वानखडे, युवराज भागवत, विद्यानंद क्षीरसागर, अजय इंगोले, विजय सावंत, मनोज गमे, बाबूराव वानखडे, बाबाराव घुमरे, मनोज इंगळे, दीपक नवघरे, आकाश हिवराळे, स्वप्निल पालकर, अजय वानखडे, बाळू सरकटे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहरात ठिकठिकाणी दगडफेकशहरात शांततेत आंदोलन सुरू असताना, काही ठिकाणी तुरळक दगडफेकीच्या घटना घडल्या. सिंधी कॅम्प, खदान परिसरासोबतच तुकाराम चौक, इन्कम टॅक्स चौकातील दुकानांवर आंदोलकांनी दगडफेक केली. तुकाराम चौकाकडून कौलखेडकडे जाणार्‍या राउंड रोडवरील आंदोलकांनी राउंड रोडवर हॉटेल व काही इमारतींवर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच गोरक्षण रोडवरील एका वाइन बारवर आंदोलकांनी दगडफेक करून काचा फोडल्या.  तर राउंड रोडवरील अँड. रवींद्र कोकाटे, अँड. किरण खोत, बिसेन आणि धस बिल्डर यांच्या इमारतीच्या खिडक्यांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. याच परिसरातील एका मुलाला दगड लागल्याने तो जखमी झाला. 

वाहनांच्या काचा फोडल्यातुकाराम चौक, खदान, मलकापूर रोड, राउंड रोड परिसरात संतप्त आंदोलकांनी चारचाकी वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. संतप्त आंदोलकांनी एमएच ३0 एटी 0५६२, एमएच 0२ एम ११८९ या क्रमांकाच्या वाहनांच्या काचा फोडल्या, तसेच बंद असलेल्या हॉटेलमधील टेबल, खुच्र्यांची तोडफोड केली. आंदोलकांनी राउंड रोडवरील विद्युत खांब पाडला तर खदान परिसरातील एटीएम फोडले.  

जुने बसस्थानकाजवळ वादआंबेडकरी आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी टॉवर चौकाकडून मोहम्मद अली रोडकडे जात असताना, काही आंदोलकांनी परिसरातील सुरू असलेली दुकाने बंद करण्यास सांगितले; परंतु काही दुकानदारांनी नकार दिल्यामुळे आंदोलकांनी त्यांच्यासोबत वाद घातला. प्रकरण चिघळणार असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे वाद निवळला. शहरातील शाळा, महाविद्यालये बंद महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी रात्रीच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सकाळपासून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होते. पालकांच्या सोयीसाठी शाळा, महाविद्यालयांसमोर बंदचे फलक लावण्यात आले होते. 

पोलीस अधीक्षकांसोबत वादमलकापूर, तुकाराम चौकात दगडफेक व वाहनांची तोडफोड केल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाहणी केली आणि आंदोलकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी पोलीस अधीक्षकांसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलीस अधीक्षक कलासागर यांनी त्यांची समजूत घातली. 

एसटीची चाके थांबली!अकोला आगारासह मंगरुळपीर, वाशिम, अमरावती, पांढरकवडा, कारंजा आणि वाशिम डेपोच्या ६0 च्यावर गाड्या अकोल्यातच थांबविण्यात आल्यात. अकोला डेपोच्या गाड्यादेखील इतरत्र रखडल्या होत्या. अकोल्यात अडकलेल्या गाड्यात ५ शिवशाहींचाही समावेश आहे. यातील दोन औरंगाबादकडे धावणार्‍या तर एक नागपूर आणि दोन अमरावतीच्या आहेत. एका दिवसात अकोला आगारचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. राज्यभरात एसटी बंद झाल्याने आणि राज्यातील वातावरण चिघडल्याने खासगी लक्झरी चालकांनीही या बंदला पाठिंबा दिला.

चालक-वाहकांसह प्रवाशांचीही केली जेवणाची सोयअकोला डेपोबाहेरील एसटीचालक आणि वाहक बुधवारी अकोल्यात अडकले.  बंदमुळे चालक-वाहकांच्या जेवणाचीही सोय नव्हती. दरम्यान, अकोला आगार क्रमांक दोनचे व्यवस्थापक अरविंद पिसोडे यांच्या नेतृत्वात राजू गोगे, अशोक सागळे, साकरकर, देवराव इंगळे, महादेव जंजाळ यांनी पुढाकार घेऊन गोगे यांनी दीडशे लोकांना पुरेल एवढय़ा पोळ्य़ा आणि बेसन-भात  घरून आणून उपाशी लोकांना जेऊ घातले. यामध्ये बसस्थानकावरील गरीब प्रवाशांनाही सहभागी करून घेतले गेले.

ग्रामीण भागात कडकडीत बंद- जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर आणि बाश्रीटाकळी शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले असून, कडकडीत बंद पाळण्यात आला. - अकोला तालुक्यातील हिंगणी येथे खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच बाळापूर येथे उभी असलेली बस जाळण्याचा प्रयत्न अज्ञात इसमांनी केला. - वाहक, चालकांनी वेळीच बस विझवल्याने पुढील अनर्थ टळला. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावAkola cityअकोला शहर