शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार इकोफ्रेन्डली पेन्सिल बनविणाऱ्या युवकाची इंडिया बुक रेकॉर्डने घेतली दखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:42 IST

त्कर्ष जैन नामक युवकाने १ हजार इकोफ्रेन्डली पेन्सिल, सीड्सबॉल पेनची निर्मिती करून अनोखा विक्रम नोंदविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील निसर्गप्रेमी उत्कर्ष जैन नामक युवकाने १ हजार इकोफ्रेन्डली पेन्सिल, सीड्सबॉल पेनची निर्मिती करून अनोखा विक्रम नोंदविला आहे. जैन यांनी बनविलेल्या इकोफ्रेन्डली पर्सनलाईज १ हजार पेन्सिल निर्मितीची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली असून, त्यांच्या विक्रमाची नोंद रेकॉर्डला घेतली आहे.उत्कर्ष जैन हे व्यावसायिक असून, निसर्गप्रेमी म्हणूनही ते ओळखले जातात. बºयाच पेन, पेन्सिलचा वापर केल्यानंतर आपण त्या कचºयात फेकून देतो. त्यामुळे कचरा साचतो; परंतु जैन यांनी, इकोफ्रेन्डली पेन्सिल आणि सीड्सबॉल पेनची निर्मिती केली. पर्यावरणाचे संतुलन राखावे आणि शालेय मुलांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश जावा, यासाठी त्यांनी सीड्सबॉलची पेनची निर्मिती केली. सीड्सबॉल पेनमध्ये विविध प्रकारच्या वृक्षांच्या बियांचा वापर त्यांनी केला. पेनचा वापर केल्यानंतर हा पेन खुल्या जागेवर, कुंडीत लावल्यास, त्यातून रोपाची उगवण होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी १ हजार इकोफ्रेन्डली पर्सनलाईज पेन्सिल तयार केल्या. त्यांच्या कार्याची इंडिया बुक रेकॉर्डने दखल घेतली आणि त्यांचा हा विक्रम आपल्या रेकॉर्डला नोंदविला. जैन यांच्या या पर्यावरणपूरक प्रकल्पाची इस्त्रो (इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन) आणि पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आणि त्यांचे कौतुकसुद्धा केले. जैन यांनी मतदान जनजागृती, स्वच्छता, योगा, पर्यावरण, वृक्षसंवर्धन, गोमाता, तंबाखूमुक्ती, रस्ते सुरक्षा, नमो पेन्सिल, चंद्रयान मोहीम, रक्तदान, नेत्रदान यासोबतच आचार्य विद्यासागर महाराज यांच्या ५00 हायस्कूल विचारांच्या पेन्सिलचीसुद्धा त्यांनी निर्मिती केली आहे. बालदिनानिमित्त त्यांनी अल्फाबेट, मराठी मुळाक्षर, पाढे, अ‍ॅनिमल सीरिज, फ्रूट, फ्लॉवर आदी विषयांच्यासुद्धा पेन्सिलची निर्मिती केली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरणSocialसामाजिक