शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सीए फायनल परीक्षेत अकोल्याचे दोघे राष्ट्रीय स्तरावर चमकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 10:56 IST

क्रिष्णा प्रफुल्ल चरखर याने ५१९ गुण घेत, देशातून ३४ वा क्रमांक तर अतुल प्रफुल्ल अग्रवाल याने ५0६ गुण घेत, ४६ वा क्रमांक पटकावला आहे.

अकोला: इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएआय) च्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये राठी करियर फोरम (आरसीएफ)च्या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवून अकोला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सोबतच अकोल्यातील ३0 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सीए-फायनल परीक्षा उत्तीर्ण करीत सीएची पदवी प्राप्त केली आहे. क्रिष्णा प्रफुल्ल चरखर याने ५१९ गुण घेत, देशातून ३४ वा क्रमांक तर अतुल प्रफुल्ल अग्रवाल याने ५0६ गुण घेत, ४६ वा क्रमांक पटकावला आहे.आयसीएआयने शुक्रवारी सीए-फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला. या निकालामध्ये अकोल्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. क्रिष्णा चरखर याने ३४ वा क्रमांक आणि अतुल अग्रवाल याने ४६ वा क्रमांक पटकावत, देशपातळीवर अकोल्याचे नाव उंचावले आहे. अतुल अग्रवाल हा सीए-आयपीसीसीमध्येसुद्धा आॅल इंडिया मेरिट आला होता, तर क्रिष्णा चरखर याचे मेरिट केवळ तीन गुणांनी हुकले होते; परंतु त्याने सीए फायनल परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. दोन्ही विद्यार्थ्यांनी आठ विषयांपैकी ७ विषयांत प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली आहे. यासोबतच जयेश माधवाणी, श्यामल चांडक, पायल नागवाणी, राधिका चितलांगे, योगिता अग्रवाल, मयूर जाडिया, कोमल चांडक, अनुज अग्रवाल, स्नेहल टावरी, ज्योती अग्रवाल, मयूरी मानधने, शुभम मानधने, शुभम मुंदडा, प्रतीक्षा चांडक, पूजा मनवाणी, मयूर जैन, उमंग चांडक, पीयूष राठी, राधिका मुंदडा, मयूर राऊत, अभिषेक व्यास, अनुप शर्मा, अक्षय लाहोटी, श्रुती खोवाल, करण तोष्णीवाल, रश्मीतकुमार, पूजा झाडे आदी विद्यार्थ्यांनी सीए फायनल परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांना आरसीएफचे संचालक सीए नीरज राठी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा. राठी यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक केले. (प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षाStudentविद्यार्थीchartered accountantसीए