शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचा ‘निनाद’ अमेरिकेत दुमदुमणार : निनाद ओक याचे जलप्रदूषणावर संशोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 02:20 IST

अकोला : सध्या जगाला जलप्रदूषणाची मोठी समस्या भेडसावत आहे. सर्वच राष्ट्रांना जलप्रदूषणासारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जलप्रदूषणासारख्या समस्या सोडविण्यासाठी अनेक राष्ट्रांमध्ये चिंतन, अभ्यास सुरू असतानाच, अकोल्यातील युवा संशोधक निनाद ओक याने वस्त्रोद्योगातील जलप्रदूषणावर महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाची अमेरिकेची सरकारी संस्था असलेल्या अमेरिकन अँकॅडेमी ऑफ सायन्सेसने दखल घेत, त्यांना संशोधन सादरीकरणासाठी पाचारण केले आहे. 

ठळक मुद्देअमेरिकन अँकॅडमी ऑफ सायन्सेसकडून निवड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सध्या जगाला जलप्रदूषणाची मोठी समस्या भेडसावत आहे. सर्वच राष्ट्रांना जलप्रदूषणासारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जलप्रदूषणासारख्या समस्या सोडविण्यासाठी अनेक राष्ट्रांमध्ये चिंतन, अभ्यास सुरू असतानाच, अकोल्यातील युवा संशोधक निनाद ओक याने वस्त्रोद्योगातील जलप्रदूषणावर महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाची अमेरिकेची सरकारी संस्था असलेल्या अमेरिकन अँकॅडेमी ऑफ सायन्सेसने दखल घेत, त्यांना संशोधन सादरीकरणासाठी पाचारण केले आहे. निनाद हा येथील प्रा. नितीन ओक यांचा मुलगा. निनादचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकोल्यात झाले. त्यानंतर निनादने आयआयटी पवई येथून पर्यावरणशास्त्रात एमटेक केले. मुंबई येथे सिव्हिल इंजिनियरिंग केले. २00३ नंतर प्रतिष्ठेचा एपी श्रेणी प्राप्त करणारा निनाद एकमेव विद्यार्थी आहे. निनाद सध्या चेन्नई आयआयटीमध्ये पर्यावरण क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. मोहन यांच्या मार्गदर्शनात संशोधन करीत आहे. यापूर्वी तो मुंबई आयआयटीला होता. वस्त्रोद्योगामध्ये मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण होते. हे जल वापरण्यायोग्य करण्यावर निनादने संशोधन केले आणि तीन महिन्यांपूर्वी त्याने हे संशोधन अमेरिकन अँकॅडमी ऑफ सायन्सेसकडे सादर केले होते. जगभरातील शेकडो संशोधकांनी सादर केलेल्या संशोधनापैकी निनादचे महत्त्वाचे संशोधन असल्याने, त्याच्या संशोधनाची अमेरिकन अँकॅडमी ऑफ सायन्सेसने निवड केली. अमेरिकेतील हय़ुस्टन येथे २५ ते २९ जून २0१८ दरम्यान होणार्‍या जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये निनाद ओक संशोधन सादर करणार आहे. त्याच्या संशोधनाचा निनाद अमेरिकेत दुमदुमणार आहे. निनादच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अमेरिकन अँकॅडमी ऑफ सायन्सेसने निवड करणं हे अकोलेकरांसाठी गौरवाची बाब आहे.  त्याच्या संशोधनामुळे अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरWaterपाणी