शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
3
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
4
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
5
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
6
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
7
‘फ्रायडे फिअर’ने इच्छुकांना ‘फिव्हर’; सर्वोच्च न्यायालयाच्या सुणावणीकडे सर्वांचे लक्ष
8
९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
9
राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या मश्रुवाला कुटुंबीयांशी जुळलाय महात्मा गांधींचा स्नेहबंध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:03 IST

मश्रुवाला कुटुंबीयांचे बापूजी व्याही होते आणि तोच स्नेहबंध गांधी-मश्रुवाला कुटुंबीयांनी अद्यापही जोपासला आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: अकोला हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिले आहे. अकोल्याच्या मातीशी अनेक मातब्बर नेत्यांची नाळ जुळली आहे. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक, राजगुरू, सुखदेव यांचेही या शहराशी एक नाते आहे. त्याप्रमाणे महात्मा गांधी यांचासुद्धा अकोला शहराशी स्नेहबंध जुळलेला आहे. बापूजींचे नाते केवळ भावनिक नव्हे, तर रक्ताने जुळलेले आहे. येथील मश्रुवाला कुटुंबीयांचे बापूजी व्याही होते आणि तोच स्नेहबंध गांधी-मश्रुवाला कुटुंबीयांनी अद्यापही जोपासला आहे.त्या काळी येथील मश्रुवाला कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. किशोरलाल मश्रुवाला यांचे महात्मा गांधी व कुटुंबीयांसोबत जुळलेले होते. पुढे गांधी परिवारासोबत मश्रुवाला कुटुंबीयांशी कायमचा ऋणानुबंध जुळला. महात्मा गांधी यांचे दुसरे चिरंजीव मणिलाल यांच्यासोबत कनूभाई मश्रुवाला यांची बहीण सुशीलाबेन यांचा ६ जून १९२७ रोजी विवाह झाला होता. अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या या विवाह सोहळ्यात महात्मा गांधीसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर त्यांचा अकोल्याशी कायमच स्नेहबंध जुळला. वºहाडात आल्यावर महात्मा गांधी आवर्जुन मश्रुवाला कुटुंबीयांच्या भेटीला येत असत. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन नानाभाई, त्यांचे सुपुत्र कनूभाई, किशोरलाल, शांतिलाल हे व्यवसायासोबतच महात्मा गांधींच्या विचारानुसार स्वातंत्र्यलढ्यात योगदान देत होते. एवढेच नाही, तर मश्रुवाला कुटुंबातील ताराबेन यांनी अकोल्यात त्या काळी पिकेटीन नावाने आंदोलन सुरू करून दारूच्या दुकानांविरुद्ध हल्लाबोल सुरू केला होता. पुढे त्यांनी १९४६ मध्ये अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अशा माधान येथे आश्रम सुरू केला होता. गांधी कुटुंबीयांसोबत मश्रुवाला नातेसंबंधाने एकमेकांत गुंतले होते. महात्मा गांधी यांची नात मनुबेन हिचा विवाहसुद्धा मश्रुवाला कुटुंबात झाला होता. त्यामुळे गांधी कुटुंबीयांचा अकोल्याचा कायमच स्नेहबंध राहिला आहे. महात्मा गांधी यांचा सहवास लाभलेले कनूभार्इंकडे गांधीजींशी जुळलेल्या अनेक आठवणी आहेत. त्यांचे पुतणे प्रियदर्शी कांतिलाल मश्रुवाला यांनी बापूजींच्या काही आठवणी, नातेसंबंधांना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला. अकोल्याशी गांधी कुटुंबाचे असलेले स्नेहबंध, आठवणी खरोखरच एक अनमोल ठेवा आहेत.

सुशीलाबेन यांनी दक्षिण आफ्रिकेत केले कार्यमहात्मा गांधी यांच्या स्नूषा सुशीलाबेन या लग्नानंतर दक्षिण आफ्रिकेत गेल्या. या ठिकाणी त्यांनी पती मणिलाल गांधी यांच्यासोबत काम केले. वर्णभेदाविरुद्ध त्यांनीही आवाज उठविला. त्यानंतर भारतात परत आल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.

महात्मा गांधी यांचे सुपुत्र मणिलाल यांचा माझी आत्या सुशीलाबेन यांच्यासोबत विवाह झाला होता. तेव्हापासून ते आजतागायत गांधी कुटुंबाशी आमचा स्नेहबंध आहे. महात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी आमच्या कुटुंबाशी जुळलेल्या आहेत. गांधी कुटुंबीयांशी नाते, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.-प्रियदर्शी मश्रुवाला, कनूभाई यांचे पुतणे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधी