शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

मुख्यमंत्र्यांच्या लोकसंवादात अकोला वेटींगवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:55 IST

अकोल्याचे शेतकरी संवादासाठी सकाळी ११ वाजतापासून उपस्थित होते; मात्र त्यांचा नंबर आलाच नाही. लोकसंवादात अकोला वेटींगवरच राहिला.

अकोला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील जालना, पालघर, अहमदनगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, जळगाव, यवतमाळ आदी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी आज लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. यावेळी अकोल्याचे शेतकरी संवादासाठी सकाळी ११ वाजतापासून उपस्थित होते; मात्र त्यांचा नंबर आलाच नाही. लोकसंवादात अकोला वेटींगवरच राहिला. यावेळी शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री, शास्त्रकर आदी उपस्थित होते.लोकसंवाद कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्ही.सी. सभागृहात जिल्ह्यातील विविध कृषी योजनांचा लाभ घेतलेले प्रवीण दांदळे, खिरपुरी, ता. बाळापूर, वर्षा केशवराव ठाकरे, कान्हेरी सरप, ता. बार्शीटाकळी, विनोद भटकर, पाटखेड, ता. बार्शीटाकळी, उमेश रमेश फुलारी, पातूर, शंकर लहामगे, आलेगाव, ता. पातूर, पुरुषोत्तम दिनकर चतरकर, कापशी रोड, ता. अकोला, महेंद्र धर्मा चक्रनारायण, अकोला, महेंद्र अरुणराव काळे, सांगळूद, ता. अकोला, भीमराव सदाशिव, यावलखेड, ता. अकोला, प्रवीण पंजाबराव खोत, समशेरपूर, ता. मूर्तिजापूर, विठ्ठल आनंदराव वाकोडे, जामडी खु., ता. मूर्तिजापूर, सतीश अशोक बोंद्रे, शिवापूर, नेव्हरी, ता. अकोट, सत्यनारायण गोविंदराव म्हसाये, वारखेड, ता. तेल्हारा, दिनेश श्रीराम देवकर, तळेगाव खु. ता. तेल्हारा आदी लाभार्थी उपस्थित होते. सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी व्हिसी सुरू झाली. दुपारी २.३० वाजता व्हिसी संपली; मात्र या संपूर्ण कालावधीत अनेक जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधण्यातच वेळ गेल्यामुळे अकोल्यातील शेतकºयांचा नंबर लागलाच नाही. वेळेची मर्यादा लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त करीत एकत्रित संवाद साधणेच उचित समजले. मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, तसेच शेती परवडेल आणि शेतकरी जगेल, म्हणून २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं ध्येय निश्चित आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातली १६,००० गावं जलपरिपूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे ३४ लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर पीक उत्पादनामध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळं तर महाराष्ट्राचा कायापालट होऊ घातला आहे. धरणातला गाळ काढून शेतात टाकल्यानं पीक उत्पन्नासाठी कमालीचा फायदा होत आहे, असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी