शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे डॉ. पराग टापरे तिसऱ्यांदा बनले आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 14:17 IST

बुसेलटनची ७०.३ आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा ही मागच्या वर्षीचा स्वत:चाच विक्रम मोडीत ७ तास ६ मिनिटात पूर्ण  करून ५ मिनिटांचा वेळ राखत जिंकली.

- योगेश फरपट  लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: आपला वैद्यकीय सांभाळत   आॅस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या आंतररष्ट्रीय आयर्न मॅन या स्पर्धेत अकोल्याचे डॉ. पराग टापरे यांनी स्पर्धा जिंकत आयर्नमॅन हा पुरस्कार प्राप्त केला आहे. डिसेंबर २०१८ ते डिसेंंबर २०१९ या एका वर्षात ते देशात तिन ठिकाणी झालेल्या स्पर्धेत आयर्न मॅन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. डॉ. पराग टापरे हे मुळचे जळगाव जामोद येथील रहिवाशी आहेत. पण सध्या अकोला येथे वैद्यकीय व्यवसायात व्यस्त असतांनाही त्यांनी काम व कुटूंब यातून वेगळा वेळ काढून नवनवीन यशाची शिखरे आतापर्यंत गाठली आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये बहरीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन या स्पर्धेत त्यांनी ७ तास ११ मिनिटात विजय प्राप्त केला होता. यामध्ये त्यात १.९१ किलोमिटर समुद्रात पोहणे, ९० किलोमिटर सायकलिंग आणि २१ किलोमिटर धावणे हे  तिन्ही प्रकार ८ तासांच्या अवधीत पूर्ण केल्याची नोंद केली आहे. दरम्यान आॅक्टोबर २०१९ मध्ये गोवा येथे  होवू घातलेल्या आंतरराष्ट्रीय  ७०.३ आयर्न मॅन या स्पर्धेसाठी पुन्हा त्यांनी जानेवारीपासून सराव केला. दरम्यान जुलै २०१९ मध्ये त्यांचा अपघात होवून हाताला दुखापत झाली. पुन्हा सायकलला हात लावणार नाही असा म्हणणाºया डॉ. पराग टापरे यांनी पुन्हा ४५ दिवसात सरावाला सुरवातही केली. आणि गोव्याची आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा त्यांचे मित्र डॉ. प्रशांत मुळावकर सर यांचे सह पूर्ण केली. यानंतर लगेचच आॅस्ट्रेलिया येथे १ डिसेंबररोजी याच स्पर्धेत उतरले. बुसेलटनची ७०.३ आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा ही मागच्या वर्षीचा स्वत:चाच विक्रम मोडीत ७ तास ६ मिनिटात पूर्ण  करून ५ मिनिटांचा वेळ राखत जिंकली. स्वत:चाच एक नवीन विक्रम स्थापित केला. जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि सोबतच प्रत्येक गोष्टींचं योग्य नियोजनामुळेच हे यश गाठल्याचे डॉ. पराग टापरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाJalgaon Jamodजळगाव जामोदdoctorडॉक्टरAustraliaआॅस्ट्रेलिया