शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अकोल्यातील ‘एटीएम’ होणार अधिक सक्षम!

By admin | Updated: November 18, 2016 02:51 IST

आवश्यक बदल करण्यासाठी सेवा प्रदाता कंपन्या सरसावल्या.

राम देशपांडे अकोला, दि. १७- ह्यकॅश नॉट अव्हेलेबलह्ण, ह्यदिस एटीएम आऊट ऑफ ऑर्डरह्ण अशा विविध कारणांमुळे बँक ग्राहक सध्याच्या घटकेला त्रस्त झाले आहेत. एटीएममध्ये भरण्यासाठी बँकांजवळ पुरेशी रोकड नाही, हे कारण जरी स्पष्ट असले, तरी नव्याने चलनात आलेल्या पाचशेच्या व दोन हजाराच्या नोटा ग्राहकांना प्रदान करण्याची सुविधा अद्याप शहरातील कुठल्याच एटीएममध्ये नसल्याचे वास्तव आहे. शहरातील एटीएम यंत्रणा अधिक सक्षम करून ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँकांच्या ह्यएटीएमह्ण सेवा प्रदाता कंपन्या कामाला लागल्या आहेत. अकोला शहरात राष्ट्रीयीकृत, खासगी व सहभागी बँकांचे एकूण १३५ पेक्षा अधिक एटीएम आहेत. जुन्या नोटांच्या तुलनेत, नव्या पाचशे व दोन हजाराच्या नोटा आकाराने लहान असल्यामुळे, एटीएम सेवा प्रदाता कंपन्यांना प्रत्येक ह्यएटीएमह्ण मशीनमध्ये तांत्रिक व संगणकीय बदल करावे लागणार आहेत. हा बदल करण्यासाठी बँकांना एटीएम सेवा प्रदान करणार्‍या कंपन्या कामाला लागल्या आहेत. एटीएम मशीनमध्ये तांत्रिक व संगणकीय बदल करण्याची तसेच त्यामध्ये नियमित रोकड जमा करण्याची जबाबदारी रिझवर्ह बँकेने स्वीकृत केलेल्या ह्यएफएसएसह्ण, ह्यएनसीआरह्ण, ह्यएजीएसह्ण, ह्यडायबोल्डह्ण, ह्यहिताचीह्ण, ह्यईपीएफह्ण व ह्यएफआयएसह्ण या कंपन्यांकडे सोपविण्यात आलेली आहे. या कंपन्या ठरावीक बँकांचा कंत्राटदार असून, ग्राहकांना नव्या पाचशेच्या व दोन हजाराच्या नोटा प्रदान करण्यासाठी या कंपन्यांना प्रत्येक एटीएम मशीनमध्ये नव्या कॅसेट्स लावाव्या लागणार असून, नव्या पाचशे व दोन हजाराच्या नोटा बाहेर फेकण्यासाठी एटीएम मशीनच्या संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत. हे सर्व बदल करण्यासाठी बँकांच्या एटीएम सेवा प्रदाता कंपन्या कामाला लागल्या असून, विस्कळीत एटीएम यंत्रणेमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक अशोक शंभरकर यांनी ह्यलोकमतह्णला दिली.का राहताहेत एटीएम बंद?एटीएम प्रणालीमध्ये अद्याप आवश्यक बदल झाले नसल्याने सध्याच्या घटकेला प्रत्येक एटीएममधून केवळ शंभराच्या नोटाच ग्राहकांना मिळत आहेत. बँकांच्या एटीएम सेवा प्रदाता कंपन्यांनी एटीएम मशीनमध्ये नियमित रोकड भरण्याची जबाबदारी एसआयपीएल, सीएमएस,लॉजी कॅश,ब्रिग्ज आर्या, एसआयएस व एसएसएमएस या संस्थांकडे सोपविली आहे. एटीएम मशीनमध्ये दिवसातून केव्हा आणि किती वेळा रोकड जमा करायची, याचे वेळापत्रक ठरलेले आहे. सध्याच्या घटकेला शंभराच्या नोटांना अधिक मागणी असल्याने, एटीएममध्ये जमा केलेल्या नोटा संपण्यास फारसा वेळ लागत नाही.