शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Akola ZP : भारिप, काँग्रेसचे गटनेते ठरले; सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 14:47 IST

भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटनेत्यांची निवड सोमवारी करण्यात आली असून, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड शुक्रवार, १७ जानेवारी रोजी होणार असून, नवनिर्वाचित सदस्यांना विशेष सभेच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटनेत्यांची निवड सोमवारी करण्यात आली असून, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे.जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी घोषित झाला असून, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित विशेष सभेत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने विशेष सभेच्या नोटीस जिल्ह्यातील सातही तहसीलदारांमार्फत जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित ५३ सदस्यांना सोमवारी पाठविण्यात आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर भारिप-बमसं आणि काँग्रेस या दोन पक्षांच्यावतीने सोमवारी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषद गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे. गटनेते ठरल्यानंतर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारिप-बमसं आणि शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून एकत्र आलेल्या महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आहे.भारिप जि.प. गटनेतेपदी ज्ञानेश्वर सुलताने!भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांची बैठक सोमवारी घेण्यात आली. त्यामध्ये भारिप-बमसं जिल्हा परिषद गटनेतेपदी ज्ञानेश्वर सुलताने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, अरुंधती शिरसाट, प्रभा शिरसाट, प्रमोद देंडवे, दीपक गवई, दामोदर जगताप, शोभा शेळके व डॉ. प्रसन्नजित गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत भारिप-बमसं सातही पंचायत समित्यांच्या गटनेत्यांचीही निवड करण्यात आली. त्यामध्ये अकोला पंचायत समिती गटनेतेपदी मंगला शिरसाट, तेल्हारा-संजय हिवराळे, अकोट-धीरज शिरसाट, बार्शीटाकळी-रामदास घाडगे, बाळापूर-अफसरखान इसा खान, पातूर-सुनीता टप्पे व मूर्तिजापूर पंचायत समिती गटनेतेपदी रवींद्र घुरडे यांची निवड करण्यात आली.काँग्रेस जि.प. गटनेतेपदी सुनील धाबेकर!काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक सोमवारी स्वराज्य भवनातील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात घेण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटनेतपदी सुनील धाबेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच बार्शीटाकळी पंचायत समिती गटनेतेपदी ऊर्मिला डाबेराव यांची निवड करण्यात आली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुंबईला रवाना!जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या राजकारणात काँग्रेस पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवार, १४ जानेवारी रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यानुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल सोमवारी सायंकाळी बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत राहायचे की भारिप-बमसंसोबत जायचे, यासंबंधीचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत मंगळवारी होणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदcongressकाँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ