शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

Akola ZP : भारिप-बमसंचा चारही सभापती पदांवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 10:19 IST

जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांवर भारिप-बमसंचे उमेदवार विजयी होतील, असा दावा जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी केला आहे.

अकोला : जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांवर भारिप-बमसंचे उमेदवार विजयी होतील, असा दावा जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी केला आहे. त्याचवेळी सभापती निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे उमेदवार सभागृहात लढत देतील, असे पक्षाचे गटनेते गोपाल दातकर यांनी सांगितले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीसोबत चर्चा केल्यानंतर उद्या निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी सांगितले.जिल्हा परिषदेत चार विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया गुरुवारी होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून उद्या बुधवारी हालचालींना वेग येणार आहे. त्यासाठी पक्षांची भूमिका ठरण्याची प्रतीक्षा होती. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या निकालानंतर अध्यक्ष पदाच्य्या निवडीसाठी अस्तित्वात आलेली शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्षाची महाविकास आघाडी कायम राहणार आहे. सभागृहात या पक्षांचे अनुक्रमे, १३, ४, ३, १ एवढे संख्याबळ आहे. या संख्याबळावर सभापती पदासाठी उमेदवारही दिले जाणार आहेत. त्यामध्ये आघाडीतील घटक पक्षांचे तीन तर एक अपक्ष सदस्याची उमेदवारी राहणार आहे. भारिप-बमसंच्या उमेदवारांसोबत त्यांची लढत होणार आहे. भारिप-बमसंचे संख्याबळ २५ आहे, तर भाजपचे ७ सदस्य आहेत. सभापती निवड प्रक्रियेदरम्यान सभागृहात भाजप कोणाच्या बाजूने राहणार की तटस्थतेची भूमिका घेणार, यावरही निवड कोणत्या पक्षाच्या उमेदवारांची होईल, हे स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आता सोबतच राहणार आहेत. त्यानुसार चारही सभापती पदांसाठी अर्ज दाखल केले जातील. सभागृहात लढत दिली जाईल. भाजपकडून कोणतीही अपेक्षा नसल्याने चर्चेचा मुद्दा शिल्लक नाही.- गोपाल दातकर, गटनेते, शिवसेना.

तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे सभापती निवड प्रक्रियेबाबत प्रदेश पातळीवरील नेत्यांशी चर्चा झालेली नाही. उद्या बुधवारी त्यांच्याशी चर्चेनंतर भाजपची भूमिका निश्चित होईल.- तेजराव थोरात, जिल्हाध्यक्ष, भाजप.

चारही सभापती ताब्यात ठेवण्याची तयारी केली आहे. पक्षाकडून चारही पदांसाठी उमेदवार दिले जातील. समविचारी पक्षांसोबत चर्चा सुरु असून ती चर्चा निश्चितच फलद्रुप होईल.- प्रदीप वानखडे,जिल्हाध्यक्ष, भारिप-बमसं.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ