शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषद : ‘डीपीसी’ निवडीसाठी मतदान होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:24 IST

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवड होणार्‍या  चार सदस्यांसाठी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप-बमसं, तसेच विरोधी पक्ष  भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने सदस्यांची निवड मतदानातून  होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या तीन उमेदवारांचे अर्ज उद्या,  शुक्रवारी दाखल होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देजिल्हा परिषद मतदारसंघात अर्ज दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवड होणार्‍या  चार सदस्यांसाठी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप-बमसं, तसेच विरोधी पक्ष  भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने सदस्यांची निवड मतदानातून  होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या तीन उमेदवारांचे अर्ज उद्या,  शुक्रवारी दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद म तदारसंघातून चार, महानगरपालिका मतदारसंघातून सात व नगरपालिका म तदारसंघातून तीन सदस्यांची निवड करण्यासाठी २९ डिसेंबर रोजी मतदान होणार  आहे. त्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी आहे.  जिल्हा परिषद मतदारसंघातील चारपैकी तीन पदे सदस्यांच्या मृत्यूमुळे रिक्त झाली  आहेत. तर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे  नियोजन समितीमध्ये त्या पदसिद्ध उपाध्यक्ष  असल्याने त्यांची राखीव पदाची जागा रिक्त झाली. त्या पदांवर निवड होण्यासाठी  भारिप-बमसंने गुरुवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव  असलेल्या गोपकर यांच्या जागेवर सरला मेश्राम, अनुसूचित जमातींसाठी राखीव  जागेसाठी श्रीकांत खोणे, इतर मागासवर्गासाठी राखीव जागेवर संजय आष्टीकर  यांचा समावेश आहे. तर सर्वसाधारण जागेसाठी पक्षाकडून उद्या अर्ज दाखल  होण्याची शक्यता आहे. नियोजन समितीमध्ये निवड होण्यासाठी भाजपने सर्वसाधारण जागेवर अहिल्या  गावंडे यांचा अर्ज दाखल होणार आहे. तर इतर उमेदवारांमध्ये मेश्राम यांच्या लढती त विलास  इंगळे, आष्टीकर यांच्याविरुद्ध मनोहर हरणे यांचा अर्ज दाखल होणार  आहे. परस्पर समन्वयाने उमेदवारांबाबत निर्णय न झाल्यास मतदान होऊ शकते,  त्यासाठी भारिप-बमसं आणि भाजपकडूनही तयारी सुरू आहे. 

भाजपकडून सर्वच जागांसाठी अर्ज दाखल करण्याची तयारी पक्षाने केली आहे,  त्यानुसार उद्या, शुक्रवारी सर्वांचे अर्ज सादर होतील. पक्षाच्या सदस्यांना निवडून  आणण्याचा प्रयत्न आहे. - रमण जैन, गटनेते, जिल्हा परिषद.

भारिप-बमसंकडूनही इतर मागासवर्गासाठी राखीव जागेवर आष्टीकर यांच्यासोबत  गीता अशोक राठोड यांचा अर्जही दाखल केला जाणार आहे, तसेच सर्वसाधारण  जागेवरही इतर महिला सदस्यांचा अर्ज दाखल केला जाईल. - दामोदर जगताप, गटनेते, जिल्हा परिषद. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक