अकोल्याला मिळणार पाच ‘फेस्टिव्हल स्पेशल’ रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:47 AM2020-10-14T10:47:09+5:302020-10-14T10:49:05+5:30

Festival Special Train अकोल्याच्या वाट्याला पाच गाड्या आल्या आहेत.

Akola will get five 'Festival Special' trains | अकोल्याला मिळणार पाच ‘फेस्टिव्हल स्पेशल’ रेल्वेगाड्या

अकोल्याला मिळणार पाच ‘फेस्टिव्हल स्पेशल’ रेल्वेगाड्या

Next
ठळक मुद्दे देशभरात १९६ ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या चालविण्याचा निर्णय.५ विशेष गाड्या अकोला स्थानकावरून जाणार.

अकोला : आगामी दसरा व दिवाळी सणाची धामधुम लक्षात घेता रेल्वे मंडळाने देशभरात १९६ ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. २० आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या गाड्या चालणार असून, यामध्ये अकोल्याच्या वाट्याला पाच गाड्या आल्या आहेत.

मुंबई - हटिया (साप्ताहिक), मुंबई - विशाखापत्तनम (साप्ताहिक), ओखा - हावडा (साप्ताहिक), हैदराबाद - जयपूर (द्वि - साप्ताहिक), अमरावती - तिरुपती (द्वि - साप्ताहिक) या ५ विशेष गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांना त्याचा फायदा होणार आहे. या सर्व गाड्या सुपरफास्ट दर्जाच्या असल्यामुळे त्या किमान ५५ किमी प्रतितास वेगाने चालविण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
या पाच विशेष गाड्यांसोबतच पुरी - सुरत आणि पुरी - मुंबई या विशेष रेल्वे सुद्धा चालवण्यात येणार आहेत. परंतु पुरी - सुरत आणि पुरी - मुंबई या नियमित रेल्वेला अकोल्यात थांबा नसल्यामुळे या विशेष गाड्यांना अकोल्यात थांबा असेल का, या बाबत साशंकता आहे. या सर्व विशेष गाड्यांमधून प्रवास करताना कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे.

Web Title: Akola will get five 'Festival Special' trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.