शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

 अकोला-पश्चिम निवडणूक निकाल :  गोवर्धन शर्मा यांची डबल ‘हॅट्ट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:48 IST

Akola-west Vidhan Sabha Election Results 2019: गोवर्धन शर्मा यांचा अवघ्या २६६२ मतांनी निसटता विजय झाला.

 - आशिष गावंडे अकोला: निकालाच्या दिवशी मतमोजणी दरम्यान सुरुवातीपासून काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण यांनी भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांच्यावर आघाडी मिळविली होती. शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज देणाऱ्या साजीद खान यांना ६७ हजार ६२९ हजार मते मिळाली तर भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांचा अवघ्या २६६२ मतांनी निसटता विजय झाला. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पराभूत होऊनही विजयी ठरल्याची भावना अकोलेकरांनी व्यक्त केली.गत पंचवीस वर्षांपासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दणदणीत विजयश्री प्राप्त करणाºया भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोवर्धन शर्मा यांना यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने कडवी झुंज दिली. पहिल्या फेरीपासून मतांची आघाडी घेणाºया काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण यांनी शेवटपर्यंत भाजपला जेरीस आणल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अखेर २० व्या फेरीनंतर भाजपने काँग्रेसला पीछाडीवर टाकत अवघ्या २ हजार ६६२ मतांनी निसटता विजय मिळविला. या निवडणुकीत भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्या नावावर ‘डबल हॅट्ट्रिक’ मारल्याची नोंद अकोल्याच्या इतिहासात झाली आहे.भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघातील मतदारांनी वेळोवेळी हिंदुत्वाच्या अजेंड्यानुसार भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकल्याचे चित्र पाहावयास मिळते. भाजपसाठी हा मतदारसंघ कायम अनुकूल मानला जातो. गत २५ वर्षांचा इतिहास पाहता या विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा दबदबा दिसून येतो. गोवर्धन शर्मा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नसली तरी त्यांना मिळालेले मताधिक्य पाहता या मतदारसंघात भाजपची तटबंदी फार मजबूत असल्याचे लक्षात येते. २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत आ. गोवर्धन शर्मा यांना ६६ हजार ९३४ मते मिळाली होती. यंदा शर्मा यांना ७० हजार २९१ मते प्राप्त झाली. पक्षाचे तगडे नेटवर्क आणि संकटसमयी मतदारांनी तारल्याची बाब गोवर्धन शर्मा यांच्या पथ्यावर पडल्याचे निकालाअंती समोर आले आहे. सलग सहाव्यांदा गोवर्धन शर्मा विजयी झाले असले तरी काँग्रेसने दिलेली निकराची लढाई अकोलेकरांच्या कायम स्मरणात राहील, हे तेवढेच खरे.

 

टॅग्स :akola-west-acअकोला पश्चिमGovardhan Sharmaगोवर्धन शर्माMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019