शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यावर जलसंकट ; कृत्रिम पावसासाठी अनुकूल वातावरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:37 IST

कृत्रिम पावसाचा प्रयोग काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राबविल्यास अकोलेकरांना पाणी मिळण्याची शक्यता आहे

अकोला : अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठा असल्याने साडे आठ लाख अकोेलेक रांवर जलसंकट उभे ठाकले आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राबविल्यास अकोलेकरांना पाणी मिळण्याची शक्यता आहे. सध्या वातावरणही अनुकूल असल्याने हा प्रयोग येथे राबविण्याची मागणी होत आहे.काटेपूर्णा धरणाचे पाणलोट क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील काटा येथे आहे; परंतु काटानंतर छोटे-मोठे १२ प्रकल्प असून, या प्रकल्पातही अपेक्षित साठा झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी काटेपूर्णा धरणात पोहोचणे कठीण आहे. याकरिता पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे.अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या वान धरणात ८३.५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात आजमितीस १५.९८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणाची अवस्थाही अशीच होती. आजमितीस २२.४१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील धरणात १०.५३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील घुंगशी बॅरेजचा जलसाठाही शून्य टक्के होता. आजमितीस ०.५८ टक्के पाणी उपलब्ध आहे. एकूणच जिल्ह्यातील वान सोडले तर सर्वच धरणात अत्यंत अल्प जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळ््याचे तीन महिने संपत आले आहेत. तथापि, आवश्यक जलसाठा उपलब्ध झाला नाही. काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पूरक पाऊस पडलाच नसल्याने या धरणात आजमितीस ९.३५ टक्केच जलसाठा उपलब्ध झाला आहे. आता पावसाचे दिवस संपत आल्याने साडे आठ लाख अकोलेकरांची चिंता वाढली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने दखल घेत काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचा प्रस्ताव तयार करू न शासनाला पाठविण्याची गरज आहे. सध्या कृत्रिम पावसासाठी वातावरण अनुकूल असल्याने पाऊस पाडणेही शक्य होणार आहे. मराठवाड्यात हा प्रयोग यशस्वी झाला असून, एका तालुक्यात दीड तास पाऊस पडला. हाच प्रयोग येथेही राबविण्याची गरज आहे.

 पावसाळा आणखी एक महिना असल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग येथे राबविण्यासाठीचा अद्याप विचार नाही तसा प्रस्ताव तयार केला नाही.जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसKatepurna Damकाटेपूर्णा धरण