शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-वाशिम जिल्ह्यातील कर्जमाफीला याद्या पडताळणीचा फेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:44 IST

एक हजार शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बुधवारी बँकेला प्राप्त झाल्या असल्या, तरी पडताळणी करून संबंधित याद्या पुन्हा शासनाकडे सादर करावयाच्या आहेत. त्यामुळे याद्या पडताळणीच्या फेर्‍यातच अद्याप शेतकर्‍यांची कर्जमाफी अडकली आहे.

ठळक मुद्देएक हजार शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या पडताळणीसाठी प्राप्त

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांतील दोन लाख शेतकर्‍यांच्या याद्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शासनाच्या ‘महाऑनलाइन पोर्टल’वर अपलोड करण्यात आल्या. त्यापैकी एक हजार शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बुधवारी बँकेला प्राप्त झाल्या असल्या, तरी पडताळणी करून संबंधित याद्या पुन्हा शासनाकडे सादर करावयाच्या आहेत. त्यामुळे याद्या पडताळणीच्या फेर्‍यातच अद्याप शेतकर्‍यांची कर्जमाफी अडकली आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत शासनाच्या ‘आपले सरकार’ या ‘पोर्टल’वर अपलोड करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या याद्या नव्याने ‘महाऑनलाइन’ या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांतील कर्जमाफीस पात्र दोन लाख शेतकर्‍यांच्या याद्या २0 नोव्हेंबरपर्यंत ‘महाऑनलाइन’ पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. पात्र शेतकर्‍यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर  आणि त्याआधारे ‘महा-आयटी’ विभागामार्फत ‘ग्रीन’ याद्या प्राप्त झाल्यानंतर पात्र शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची अपेक्षा करण्यात येत होती; परंतु अकोला व वाशिम जिल्ह्यांतील कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या अपलोड करण्यात आलेल्या याद्यांपैकी दोन्ही जिल्ह्यांतील एक हजार शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या पडताळणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २२ नोव्हेंबर रोजी शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत प्राप्त झाल्या. त्यानुसार प्राप्त शेतकर्‍यांच्या  ‘ग्रीन’ याद्यांची पडताळणी करून बँकमार्फत शेतकर्‍यांच्या याद्या परत ‘महा-आयटी’ विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांची प्रत्यक्ष कर्जमाफी याद्या पडताळणीच्या फेर्‍यात अडकली आहे.

‘ग्रीन’ याद्यांची अशी होणार पडताळणी!शासनाच्या महा-आयटी विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झालेल्या एक हजार शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रीन याद्यांमधील पात्र शेतकर्‍यांचे नाव, कर्जाची रक्कम, बँक व कर्ज खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी मुद्यांची पडताळणी बँकेमार्फत करण्यात येणार आहे.

दोन लाख शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ल्ल कर्जमाफीस पात्र ठरलेल्या अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील दोन लाख शेतकर्‍यांच्या याद्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत महाऑनलाइन या पोर्टलवर २0 नोव्हेंबरपर्यंत अपलोड करण्यात आल्या. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील १ लाख १२ हजार आणि वाशिम जिल्ह्यातील ८८ हजार शेतकर्‍यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या. त्यापैकी अकोला जिल्ह्यातील ३९१ आणि वाशिम जिल्ह्यातील ६0९ अशा केवळ एक हजार शेतकर्‍यांच्या याद्या जिल्हा बँकेला पडताळणीसाठी प्राप्त झाल्या.

कर्जमाफी योजनेंतर्गत अपलोड केलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांपैकी अकोला व वाशिम जिल्ह्यांतील  एक हजार शेतकर्‍यांच्या ग्रीन याद्या प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त ग्रीन याद्यांची पडताळणी करून पुन्हा या याद्या शासनाच्या महाऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावयाच्या आहेत.-अनंत वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक- 

टॅग्स :Akola cityअकोला शहरFarmerशेतकरी