शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’, एमआयएम जागा वाटपातही होणार गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 12:12 IST

अ‍ॅड. आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यातील पाचपैकी तीन मतदारसंघावर एमआयएमचा डोळा असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

- राजेश शेगोकार

अकोला: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयांची गणिते बिघडविणारी वंचित बहुजन आघाडी व एमआयएम या जोडीने आता विधानसभेसाठी पुन्हा एकदा एकत्रीतरीत्या समोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. एमआयएमने वंचितकडे आघाडीमध्ये १०० जागा लढविण्याबाबत ई-मेलद्वारे प्रस्ताव दिल्याची चर्चा असून, हा प्रस्तावच वंचितच्या तयारीमध्ये जागा वाटप हा मुद्दा तिढा निर्माण करण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीसाठी मुस्लीम, दलित व वंचित बहुजन अशा व्होट बँकेला कॅश करण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाऊल उचलले होते. त्याचा फटका काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसला तब्बल १५ लोकसभा मतदारसंघात बसला. त्यामुळे आता काँग्रेसने वंचितसोबत आघाडी करण्यासाठी अनुकूलता दाखविली आहे. आघाडीमध्ये वंचितला जागा किती, हा कळीचा मुद्दा असल्याने काँगे्रस आघाडीसोबतची चर्चाही अजून प्राथमिक अवस्थेतच आहे. दुसरीकडे एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मिळविलेल्या यशामुळे तसेच वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे एमआयएमलाही महत्त्वाकांक्षेचे घुमारे फुटले आहेत. वंचितच्या मतदारांनी एमआयएमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास राज्यातील १०० मतदारसंघात निकाल फिरू शकतात, असा दावा एमआयएमकडून केला जात असून, त्यामधूनच शंभर जागांची मागणी पुढे आल्याची चर्चा आहे. अ‍ॅड. आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यातील पाचपैकी तीन मतदारसंघावर एमआयएमचा डोळा असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच जागा वाटप या मुद्यावरून वंचित व एमआयएम यांच्यामध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित व एमआयएमच्या आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. विधानसभेसाठीही आम्ही सज्ज आहोत. जागा वाटपाबाबत अद्यापपावेतो चर्चेची बैठक झालेली नाही. बाळासाहेबांनी एमआयएमसोबत चर्चेकरिता मनोहर रोकडे, शंकरलाल बारिंगे, सुभाष तन्वर यांची नियुक्त केली आहे. सध्या तरी केवळ माध्यमांमध्येच चर्चा आहे.- अशोक सोनोने, प्रदेशाध्यक्ष, भारिप-बमसं.

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोला