शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : बलात्कार प्रकरणातील दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:54 IST

अकोला : तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या तसेच एलआरटी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला व्यवसायाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्‍या आरोपीस डाबकी रोड पोलिसांनी सोमवारी अटक केली. मुलीचा गर्भपात करणार्‍या डॉ. अनिल तायडेलाही पोलिसांनी जळगाव खांदेश येथून अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देजळगाव खांन्देशातील डॉ. तायडे व मुख्य आरोपीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या तसेच एलआरटी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला व्यवसायाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्‍या आरोपीस डाबकी रोड पोलिसांनी सोमवारी अटक केली. मुलीचा गर्भपात करणार्‍या डॉ. अनिल तायडेलाही पोलिसांनी जळगाव खांदेश येथून अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. एलआरटी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय युवतीने एका वर्तमानपत्रात घरी बसल्या द्रोण बनविण्याचा व्यवसाय करा, अशी जाहिरात वाचली. या जाहिरातीच्या आधारे युवतीने डाबकी रोडवरील रहिवासी उमेश अनमोल याच्याशी संपर्क साधला. त्याने युवतीला व्यवसाय उभारण्याचे आमिष देऊन पाच लाख रुपयांची मागणी केली. मात्र, युवतीकडे पैसे नसल्याने उमेश अनमोल याने त्याची पत्नी सुवर्णा उमेश अनमोल हिला सोबत घेऊन युवतीला तिच्या नावावर असलेल्या शेतीवर ५ टक्के व्याजदराने खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन दिले. उमेशची पत्नी सुवर्णा व सदर युवती या दोघींच्या नावाने हा व्यवसाय थाटण्यात येणार असल्याचे आमिष युवतीला देण्यात आले. त्यानंतर युवतीने तिच्या शेतीवर पाच लाख रुपये कर्ज घेतले. सदर कर्जाची रक्कम उमेश अनमोल याने स्वत:जवळ ठेवून घेतली. मात्र, युवतीला व्यवसाय थाटण्याची सामग्री दिली नाही. त्यामुळे युवतीने शेतीवर घेतलेले कर्ज तातडीने फेडून शेतीवरील बोझा कमी करण्यासाठी अनमोल याला तगादा लावला. मात्र, उमेश अनमोल याने युवतीला सांगितले, की त्याचे पत्नीशी वाद होत असून, तिला घटस्फोट देणार आहे. तसेच युवतीला मी तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर युवती व उमेश अनमोल हे दोघे जळगाव खान्देश येथे राहावयास गेले. बँकेतून कर्ज काढून पैसे परत करण्याचे आमिष देऊन उमेशने युवतीवर बलात्कार केला. यामध्ये मुलगी गर्भवती राहिल्याने डॉ. अनिल तायडे याच्याकडे तिचा गर्भपात करण्यात आला. फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात येताच तिने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीवरून उमेश अनमोल, सुवर्णा अनमोल, इक्बाल हुसेन व डॉ. अनिल तायडे रा. जळगाव खान्देश यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर यामधील मुख्य आरोपी उमेश अनमोल व गर्भपात करणारा डॉ. अनिल तायडे या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :ArrestअटकRapeबलात्कारCrimeगुन्हाAkola cityअकोला शहरTelharaतेल्हारा