शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : मोरगाव सादीजन येथे दोन गटांमध्ये हाणामारी; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 21:52 IST

उरळ (अकोला): नजीकच्या मोरगाव सादीजन येथे जागेच्या वादाच्या कारणावरून दोन गटांतील लोकांनी परस्परांच्या घरात बेकादेशीररीत्या घुसून परस्परांना अश्लिल शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी, काठय़ांनी मारहाण केल्याची घटना २२ जानेवारीच्या सकाळी ९ ते १0 वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देअश्लिल शिवीगाळ करीत परस्परांच्या घरात घुसून केली मारहाण 

लोकमत न्यूज नेटवर्कउरळ (अकोला): नजीकच्या मोरगाव सादीजन येथे जागेच्या वादाच्या कारणावरून दोन गटांतील लोकांनी परस्परांच्या घरात बेकादेशीररीत्या घुसून परस्परांना अश्लिल शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी, काठय़ांनी मारहाण केल्याची घटना २२ जानेवारीच्या सकाळी ९ ते १0 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेबाबत दोन्ही बाजुंच्या लोकांनी परस्परांविरुद्ध उरळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यांदीवरून व वैद्यकीय अहवालावरून उरळ पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध भा.दं.वि.च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी मोरगाव सादीजनच्या पुष्पा पांडुरंग गिरी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार  विजय गिरी, आरती विजय गिरी व लता सुरेश गिरी यांनी जागेच्या वादाच्या कारणावरून २२ जानेवारीच्या सकाळी ९ ते १0 वाजताच्या सुमारास तिच्या घरात संगनमताने घुसून फिर्यादी, तिचा पती व तिची दिराणी यांना अश्लिल शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी पुष्पा गिरी हिची फिर्याद व वैद्यकीय अहवालावरून उपरोल्लेखित व्यक्तींविरुद्ध भा.दं.वि.च्या २९४, ३२३,३२४, ५0४, ५0६,व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच याच प्रकरणी आरती विजय गिरी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पांडुरंग ओंकार गिरी, विष्णू वामन गिरी, पुष्पा पांडुरंग गिरी व उद्धव गिरी यांनी जागेच्या वादाच्या कारणावरून संगनमताने २२ जानेवारीच्या सकाळी ९ ते १0 वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घरात बेकादेशीररीत्या घुसून अश्लिल शिवीगाळ करीत तिला लाथा-बुक्कयांनी मारहाण केली. तसेच घरातील सामान फेकून दिले. याबाबत फिर्यादी आरती विजय गिरी यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी उपरोल्लेखित व्यक्तींविरुद्ध भा.दं.वि.च्या ३२३, ३२४, ४५२, ५0४ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक हरिदास काळे, जमादार दादाराव लिखार, जमादार संजय तायडे, पोलीस कॉन्स्टेबल ,प्रवीण मोरे हे करीत आहेत.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हा