शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : गवळीपुरात दोन गटात तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:05 IST

या हाणामारीत दोन्ही गटातील सुमारे ३० जनांनी परस्परांवर शस्त्रांनी हल्ला चढविल्याने यामध्ये तब्बल १७ जन जखमी झाले.

अकोला : रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथे दोन गटात तूफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी घडली. या हाणामारीत शस्त्र वापरण्यात आल्याने तब्बल १७ जन जखमी झाले असून यामधील दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी १५ जनांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असून दोन जनांवर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी दोन्ही गटातील सुमारे ३० जनांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.गवळीपुरा येथे गोरवे नामक कुटुंबीय रहिवासी असून त्यांच्याच बाजुला त्यांचे नातेवाईक असलेले कुटुंबीयांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. या वादानंतर दोन्ही कुटुंबामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील सुमारे ३० जनांनी परस्परांवर शस्त्रांनी हल्ला चढविल्याने यामध्ये तब्बल १७ जन जखमी झाले असून यामधील दोन जनांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे या दोन जनांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तलवार, पाईप, लोखंडी रॉड तसेच काठीने मारहाण केल्यामुळे या हाणामारीत गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोन्ही गटातील जखमींना सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवीले. तसेच घटनास्थळ पंचनामा करून परस्परांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी