लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आपातापा रोडवरील पॉवर हाउससमोर झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दर्यापूर तालुक्यातील सोनखेड येथील रहिवासी पांडुरंग शालीग्राम चव्हाण व सचिन ताराचंद्र महाजन २३ रा. सोनखेड हे दोघे एम एच ३0 एबी १९५0 दुचाकीने अकोल्यावरून दर्यापूरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला समोरुन येणार्या एम एच ३0 एएस ७५0 च्या चालकाने जबर धडक दिली. या अपघातात सचिन ताराचंद महाजन यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर शालीग्राम चव्हाण यांनी सिव्हिल लाइनस पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एम एच ३0 एएस ७५0 च्या चालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
अकोला : दोन दुचाकींचा अपघात; एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:07 IST
अकोला : आपातापा रोडवरील पॉवर हाउससमोर झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला : दोन दुचाकींचा अपघात; एक जण ठार
ठळक मुद्देशनिवारी रात्री आपातापा मार्गावरील पॉवर हाउससमोर घडला अपघातलाइन्स पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल