शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अकोला येथे ३५ लाखांचा खतसाठा जप्त

By admin | Updated: June 22, 2014 01:55 IST

भरारी पथकाच्या सूचनेवरून अकोला कृषी विभागाची कारवाई.

अकोला : शहरापासून नजीकच असलेल्या, आपातापा मार्गावरील एका गोदामातून, शनिवारी रासायनिक (सिंगल सुपर फॉस्फेट व डीएपी) खतांच्या आठ हजार गोण्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या खताची किंमत ३४ लाख ४४ हजार रुपये एवढी आहे. एका कंपनीच्या गतवर्षीची उत्पादन दिनांक असलेल्या गोण्यांमधील खते, दुसर्‍या कंपनीच्या ताजी उत्पादन दिनांक असलेल्या गोण्यांमध्ये भरण्याचे बेकायदेशीर काम येथे केले जात होते. भरारी पथकाच्या सूचनेवरू न कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. आपातापा मार्गावरील शंकरनगरला लागून साईबाबा वेअर हाऊसिंगचे १६ हजार चौरस फूट क्षेत्रावर गोदाम आहे. त्या गोदामातच खतांचा साठा ठेवलेला होता. गुजरात राज्यातील नंदेसरी येथील लिबर्टी फॉस्फेट लिमिटेड कंपनीच्या, ग्रो मोअर डबल हॉर्स या ह्यबॅ्रन्ड नेमह्णने विकल्या जाणार्‍या एसएसपी खताचा तो साठा होता. सदर कंपनीने ते खत सप्टेबर २0१३ मध्ये गोण्यांमध्ये भरले होते. सदर खत गुजरातमधीलच कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या जून २0१४ ही उत्पादन दिनांक घातलेल्या गोण्यांमध्ये भरले जात होते. तिथेच गुजरातमधीलच सरदार ह्यबॅ्रन्डह्णचे डीएपी खतही आढळून आले. तेदेखील एका गोणीतून दुसर्‍या गोणीत भरण्यात येत होते. कृषी विभागाच्या भरारी पथकाला सदर गोदामात खताचा अवैध साठा असल्याची सूचना मिळताच, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी गिरीश नानोटी, भरारी पथकाचे पंचायत समिती कृषी अधिकारी गोपाल बोंडे, तालुका कृषी अधिकारी के. आर. चौधरी आदी अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या पथकाने गोदामावर छापा घातला.