शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : सांगळूद बुद्रूक येथील एकाच कुटुंबातील तिघांना घरकुलाचा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:10 IST

अकोला : सांगळूद बुद्रूक येथील एकाच कुटुंबातील तिघांना घरकुलाचा लाभ देताना शासनाचे निकष, नियम धाब्यावर बसविण्यात आले. त्यातून शासनाची फसवणूक करण्यात आली. ती रक्कम लाभार्थींसह ग्रामपंचायत सरपंच, सचिव, देयक अदा करणार्‍या यंत्रणेकडून वसूल करण्याची मागणी अमोल सिरसाट यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांना मंगळवारी दुसर्‍यांदा दिलेल्या तक्रारीत केली. 

ठळक मुद्देलाभार्थी व देयक अदा करणार्‍या यंत्रणेकडून रक्कम वसूल करण्याची मागणी सर्व संबंधितांवर कारवाईच्या मागणीची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सांगळूद बुद्रूक येथील एकाच कुटुंबातील तिघांना घरकुलाचा लाभ देताना शासनाचे निकष, नियम धाब्यावर बसविण्यात आले. त्यातून शासनाची फसवणूक करण्यात आली. ती रक्कम लाभार्थींसह ग्रामपंचायत सरपंच, सचिव, देयक अदा करणार्‍या यंत्रणेकडून वसूल करण्याची मागणी अमोल सिरसाट यांनी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना मंगळवारी दुसर्‍यांदा दिलेल्या तक्रारीत केली. सांगळूद ग्रामपंचायतचे सरपंच अमोल येले यांच्यासह सचिवांनी १५ ऑगस्ट २0१६ रोजीच्या ग्रामसभेत रमाई आवास योजनेसाठी प्रदीप मुरलीधर पळसपगार यांची निवड निकष डावलून केली. प्रत्यक्षात त्यांच्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागात १५ लाख रुपये र्मयादेत कामे करण्याच्या कंत्राटदार परवान्याची नोंद आहे. त्याच सभेत संदीप मुरलीधर पळसपगार यांचीही निवड केली. त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे. त्याच सभेत इंदूबाई मुरलीधर पळसपगार यांचीही निवड केली. एकाच घरातील तिघांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पात्र नसतानाही एकाच सभेत निवड केली. याप्रकरणी लाभार्थींसह शासनाची फसवणूक करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, बेकायदेशीरपणे अनुदान वितरित करणार्‍यांकडून वसुलीची कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत अमोल सिरसाट यांनी केली.

आधीच्या तक्रारीतील कागदपत्रे गहाळपात्र नसतानाही घरकुलाचा लाभ घेतल्याची तक्रार पालकमंत्री डॉ. पाटील यांच्या जनता दरबारात आधीही करण्यात आली. त्या तक्रारीसोबत पुरावेही जोडण्यात आले; मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने मंगळवार, २६ डिसेंबर रोजी पुन्हा तक्रार दिल्यानंतर आधीच्या तक्रारीतील पुरावे गहाळ असल्याचे पुढे आले. त्यामुळे मंगळवारी पुन्हा पुराव्यासह तक्रार दिली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषद