शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अकोल्यात ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:41 AM

अकोला : निसर्गकट्टा व सामाजिक वनीकरण विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. मंगरुळपीर मार्गावरील खडकी परिसरातील जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब येथे आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय पर्यावरण परिषदेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. 

ठळक मुद्देनिसर्गकट्टा, सामाजिक वनीकरण विभाग यांचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : निसर्गकट्टा व सामाजिक वनीकरण विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. मंगरुळपीर मार्गावरील खडकी परिसरातील जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब येथे आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय पर्यावरण परिषदेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. निसर्ग लोक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक व इतर जनसामान्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेल्या या पर्यावरण परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅबचे संचालक प्रशांत गावंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून सातारा जिल्हय़ातील कर्‍हाड येथील निसर्ग शिक्षक सुधीर कुंभार, सामाजिक वनीकरण विभाग अकोलाचे विभागीय वन अधिकारी विजय माने, विदर्भ पर्यावरण परिषदेचे नागपूर येथील समन्वयक लोकमित्र संजय सोनटक्के व निसर्ग कट्टाचे प्रकल्प अधिकारी गौरव झटाले उपस्थित राहणार आहेत. या तीन दिवसीय परिषदेत दिलीप गोडे, मोहन हिराबाई हिरालाल, किशोर रिठे, सुनील कुंभार, निशिकांत काळे, प्रा. नीलेश हेडा, प्रकाश लढ्ढा, मधु घारड, प्रभाकर पुसदकर, प्रफुल्ल सावरकर, मिलिंद सावदेकर, मोहिनी मोडक व सुभाष गोरे ही तज्ज्ञ मंडळी तीन दिवस विविध सत्रात पर्यावरण संवर्धनाशी निगडित विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण परिषदेचे संयोजक अमोल सावंत, सामाजिक वनीकरण विभागाच्या एसीएफ लीना आदे, जेआरडी टाटा स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा फोकमारे यांनी केले आहे. परिषदेच्या यशस्वितेसाठी सातपुडा फाऊंडेशन तथा जेआरडी टाटा एड्युलॅब तथा आयोजन समितीतील सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.                       

टॅग्स :Akola cityअकोला शहरNatureनिसर्ग