लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : निसर्गकट्टा व सामाजिक वनीकरण विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. मंगरुळपीर मार्गावरील खडकी परिसरातील जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब येथे आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय पर्यावरण परिषदेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. निसर्ग लोक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक व इतर जनसामान्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेल्या या पर्यावरण परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅबचे संचालक प्रशांत गावंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून सातारा जिल्हय़ातील कर्हाड येथील निसर्ग शिक्षक सुधीर कुंभार, सामाजिक वनीकरण विभाग अकोलाचे विभागीय वन अधिकारी विजय माने, विदर्भ पर्यावरण परिषदेचे नागपूर येथील समन्वयक लोकमित्र संजय सोनटक्के व निसर्ग कट्टाचे प्रकल्प अधिकारी गौरव झटाले उपस्थित राहणार आहेत. या तीन दिवसीय परिषदेत दिलीप गोडे, मोहन हिराबाई हिरालाल, किशोर रिठे, सुनील कुंभार, निशिकांत काळे, प्रा. नीलेश हेडा, प्रकाश लढ्ढा, मधु घारड, प्रभाकर पुसदकर, प्रफुल्ल सावरकर, मिलिंद सावदेकर, मोहिनी मोडक व सुभाष गोरे ही तज्ज्ञ मंडळी तीन दिवस विविध सत्रात पर्यावरण संवर्धनाशी निगडित विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण परिषदेचे संयोजक अमोल सावंत, सामाजिक वनीकरण विभागाच्या एसीएफ लीना आदे, जेआरडी टाटा स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा फोकमारे यांनी केले आहे. परिषदेच्या यशस्वितेसाठी सातपुडा फाऊंडेशन तथा जेआरडी टाटा एड्युलॅब तथा आयोजन समितीतील सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
अकोल्यात ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:44 IST
अकोला : निसर्गकट्टा व सामाजिक वनीकरण विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. मंगरुळपीर मार्गावरील खडकी परिसरातील जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब येथे आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय पर्यावरण परिषदेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
अकोल्यात ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद
ठळक मुद्देनिसर्गकट्टा, सामाजिक वनीकरण विभाग यांचा संयुक्त उपक्रम