शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अकोला : मजुरांना देण्यासाठीही रोहयोच्या खात्यात निधी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:51 IST

अकोला : दुष्काळी स्थितीत मजुरांच्या हाताला काम, ते नसल्यास बेकारी भत्ता देण्याचा कायदा करणार्‍या शासनाच्या खात्यात मजुरांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला देण्यासही निधी उपलब्ध नाही. डिसेंबर २0१७ पासून अकोला जिल्हय़ातील ४५00 पेक्षाही मजुरीचे मस्टर प्रलंबित आहेत. घरकुलासह रोजगार हमी योजनेच्या सर्वच मजुरांना तीन महिन्यांपासून मजुरी खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे४५00 पेक्षाही अधिक मजुरांचे १२ लाख शासनाकडे थकीत

सदानंद सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दुष्काळी स्थितीत मजुरांच्या हाताला काम, ते नसल्यास बेकारी भत्ता देण्याचा कायदा करणार्‍या शासनाच्या खात्यात मजुरांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला देण्यासही निधी उपलब्ध नाही. डिसेंबर २0१७ पासून अकोला जिल्हय़ातील ४५00 पेक्षाही मजुरीचे मस्टर प्रलंबित आहेत. घरकुलासह रोजगार हमी योजनेच्या सर्वच मजुरांना तीन महिन्यांपासून मजुरी खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा आहे.दुष्काळी भागात मजुरांच्या हाताला काम देणे, काम देण्यास शासन असर्मथ ठरल्यास मजुरांना बेकारी भत्ता देण्याची तरतूद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्यात आहे. कायद्यातील या तरतुदीनुसार कामावर असलेल्या मजुरांना वेळेवर मजुरी देणे, ही जबाबदारीही शासनाची आहे. ठरलेल्या वेळेत मजुरी अदा न केल्यास त्याची जबाबदारी निश्‍चित करून संबंधितांकडून दंड वसूल करण्याचीही तरतूद आहे; मात्र आता शासनाकडूनच मजुरी अदा करण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे कायद्यानुसार आता कोणाला दंड होईल, ही बाब शासनासाठी अडचणीची ठरणार आहे. जिल्हय़ात ६0 टक्के जलसंधारण आणि ४0 टक्के इतर या प्रमाणात काही कामे सुरू आहेत. त्या कामांवर मजूरही कार्यरत आहेत. त्या मजुरांना मजुरी मिळण्यासाठी मस्टर ऑनलाइन करण्यात आले. शेतरस्ते आणि घरकुलाच्या मजुरीची मागणी मोठय़ा प्रमाणात आहे. डिसेंबरपासून मजुरीची मागणी नोंदवण्यात आली. जिल्हय़ातील प्रलंबित असलेल्या २३८ मागणीपत्रांमध्ये ४५११ मजुरांसाठी १२ लाख ६१ हजार १0६ रुपयांची मागणी आहे. त्यापैकी कोणत्याही मजुराच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. तीन महिन्यांपासून त्यांना रक्कम मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्हय़ातील रोजगार हमी योजनेची कामेच प्रभावित झाली आहेत. मेहनतीची मजुरी तर सोडाच, ज्या गावात मागणी असूनही काम नाही, त्यांना बेकारी भत्ता मिळेल का, हा प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे. 

घरकुलाच्या लाभार्थींना त्रासघरकुलासाठी ९0 ते ९५ दिवसांची मजुरी लाभार्थींना दिली जाते. हजेरीपत्रकांसह इतर नोंदीसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंते प्रत्यक्ष लाभार्थींच्या घरी भेट देतात. त्यावेळी लाभार्थींना थेट पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार जिल्हय़ातील अनेक पंचायत समित्यांमध्ये सुरू आहेत. काहींनी तर लाभार्थींकडून दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळल्याचीही उदाहरणे आहेत. ती न दिल्यास हजेरीपत्रक न भरणे, स्थळदर्शक, जागेच्या चतु:सीमा, मोजमाप नोंदीमध्ये त्रुटी ठेवून हप्ता, रोहयोची मजुरी निघण्यास विलंब करण्याची भीतीही त्यांच्याकडून दाखविली जात आहे. 

टॅग्स :Akolaअकोला