शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : मालमत्तांचे करवाढ प्रकरण; मुख्यमंत्र्यांच्या सुनावणीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 15:19 IST

अकोला : करवाढप्रकरणी विभागीय आयुक्त, अमरावती यांनी तयार केलेल्या तेरा पानांच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होणार होती. करवाढीच्या मुद्यावर नागपूर हायकोर्टाचा निर्वाळा लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांच्या सुनावणीकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देतत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले. तसेच सुधारित दरवाढ लागू केली. मनपाने केलेली करवाढ नियमबाह्य असल्याचे नमूद करीत काँग्रेस, भारिप-बमसंच्यावतीने विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती.याविषयी विभागीय आयुक्तांनी तेरा पानांचा अहवाल तयार केला असता, त्यामध्ये करवाढीच्या मुद्यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

अकोला : महापालिका प्रशासनाने केलेल्या करवाढीवर आक्षेप घेत शहरातील एका चॅरिटेबल संस्थेच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या दिवाणी खटल्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. करवाढप्रकरणी विभागीय आयुक्त, अमरावती यांनी तयार केलेल्या तेरा पानांच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होणार होती. करवाढीच्या मुद्यावर नागपूर हायकोर्टाचा निर्वाळा लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांच्या सुनावणीकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.मनपा प्रशासनाने मागील १८ वर्षांपासून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न केल्यामुळे अकोलेकरांच्या कर रकमेत वाढच झाली नाही. परिणामी मनपाच्या महसुलात घसरण होऊन कर्मचाºयांच्या थकीत वेतनाची समस्या निर्माण झाली. शासनाने सुद्धा वारंवार कर्ज उपलब्ध करून देण्यास नकार देत, उत्पन्न वाढीचे निर्देश दिले होते. त्यामुळे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले. तसेच सुधारित दरवाढ लागू केली. मनपाने केलेली करवाढ नियमबाह्य असल्याचे नमूद करीत काँग्रेस, भारिप-बमसंच्यावतीने विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. याविषयी विभागीय आयुक्तांनी तेरा पानांचा अहवाल तयार केला असता, त्यामध्ये करवाढीच्या मुद्यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री सुनावणी घेतील, असे भारिप-बमसंचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. यादरम्यान, शहरातील एका चॅरिटेबल संस्थेच्यावतीने चालविल्या जाणाºया शाळा, महाविद्यालयांवर प्रशासनाने कर आकारणी केली. मनपाच्या करवाढीला चॅरिटेबल संस्थेने आव्हान देत स्थानिक न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. न्यायालयाने मनपाच्या विरोधात निकाल दिल्यामुळे या निर्णयाला मनपाच्यावतीने नागपूर हायकोर्टात आव्हान देण्यात आले. मनपाचा थकीत मालमत्ता कर जमा केल्यानंतरच संबंधित व्यक्ती, सार्वजनिक संस्था, चॅरिटेबल संस्था यांना मनपाकडे केवळ अपील दाखल करता येत असल्याचे नमूद करीत नागपूर हायकोर्टाने करवाढीसंदर्भात निर्वाळा दिला. उच्च न्यायालयाच्या निकालामुळे करवाढीला विरोध करणाºया शिवसेना, भारिप-बमसं, काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे होणाºया सुनावणीचा मुहूर्त कधी निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

उच्च न्यायालयात याचिका का नाही?करवाढीच्या मुद्यावरून मनपातील सर्वच विरोधी पक्षांनी आगामी निवडणुका लक्षात घेत राजकीय मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. क रवाढीला विभागीय आयुक्तांशिवाय थेट उच्च न्यायालयातही आव्हान देता आले असते; परंतु तसे न केल्यामुळे विरोधकांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाChief Ministerमुख्यमंत्री