शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : दोघांचा संशयास्पद मृत्यू; विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:04 IST

शेख सउद शेख रमजान आणि फारुख केरु जमुरेवाले असे दोन्ही मृतकांची नावे असून त्यांनी विषारी दारु पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आकोट फैल पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अकोला : आकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय नगर येथील रहिवासी दोन जनांचा सोमवारी दुपारी अचानकच मृत्यू झाल्याची घटना घडली. शेख सउद शेख रमजान आणि फारुख केरु जमुरेवाले असे दोन्ही मृतकांची नावे असून त्यांनी विषारी दारु पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आकोट फैल पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात ठेवण्यात आले असून याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्युचे नेमके कारण समोर येणार आहे.आकोट फैलातील संजय नगर येथील रहिवासी शेख सउद शेख रमजान (26)आणि फारुख केरु जमुरेवाले (२७) या दोघांनी याच परिसरात चालविण्यात येत असलेल्या गावठी दारुच्या भट्टयावरील दारु पिल्याची चर्चा आहे. यामधील शेख सउद शेख रमजान सोमवारी दुपारी घरी आल्यानंतर त्याला अंगात जळजळ होत असल्याने थंड पाण्याने आंघोळ केली. मात्र त्यानंतर काही वेळताच त्याचा मृत्यू झाला. याच परिसरातहील रहिवासी असलेला त्याचा मीत्र फारुख केरु जमुरेवाले यालाही अशा प्रकारच्या वेदना झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आकोट फैल पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरु केली. मात्र दोघांच्याही मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान या दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले असून उत्तरिय तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण उघडकीस येणार आहे. या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी सद्या आकस्मीक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.कोरोनाचीही प्रचंड अफवादरम्यान सदर दोन्ही जनांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गजन्य विषानुमुळेही झाल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे भितीचे वातावरणही निर्माण झाले होते. या अफवेमुळे पोलिसांच्याही मनात संशय आल्याने त्यांनी सदर प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तपास सुरु केला आहे. मात्र या दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण आता उत्तरिय तपासणीच्या अहवालानंतरच समोर येणार आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाDeathमृत्यू