शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : शिवर येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:44 IST

अकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाला. या युवकाच्या मृत्यूचे कारण समोर आले नसले, तरी त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देमारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाला. या युवकाच्या मृत्यूचे कारण समोर आले नसले, तरी त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.शिवर येथील रहिवासी गणेश अशोक सुरतकर (३0) हा रविवारी सकाळपासून दारूच्या नशेत होता. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फिरत असताना रात्रीच्यादरम्यान बसस्थानक पोलीस चौकीतील एका पोलीस कर्मचार्‍याने त्याला पोलीस चौकीत बसवून ठेवले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. गणेश सुरतकरची पत्नी दुर्गा व शेजारी राहणारे उमेश निकम पाटील हे बसस्थानक पोलीस चौकीत सुरतकर यांना घेण्यासाठी आले. चौकीतील पोलीस कर्मचारी दाते यांनी नांेद घेऊन गणेश सुरतकर यांना ताब्यात दिल्याची माहिती सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात सांगितली. तसेच ही नोंद पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत घेण्यात आली. रात्री गणेश सुरतकर, त्यांची पत्नी व शेजारी घरी परतल्यानंतर सोमवारी पहाटे गणेश सुरतकर यांचा मृत्यू झाला. सुरतकर यांचा मृत्यू झाल्याचे बसस्थानक पोलीस चौकीतील कर्मचार्‍यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, बसस्थानक परिसरातील एका अंड्याच्या गाडीवर गणेश सुरतकर यांना मारहाण झाल्याचे समोर आले आहे. सिव्हिल लाइन पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मृत्यूचा तपास पोलीस निरीक्षक अन्वर शेख करीत आहेत.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणDeathमृत्यू