शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : गावंडगाव येथे युवा शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 20:39 IST

आलेगाव (अकोला): येथून जवळ असलेल्या व चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येणार्‍या गावंडगाव येथील वसंता कान्हू राठोड या ३0 वर्षीय तरूण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणास कंटाळून  १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देवसंता कान्हू राठोड असे ३0 वर्षीय युवा शेतकर्‍याचे नाववसंता राठोड याच्यावर बँकेचे तसेच सावकाराचे कर्ज होतेआत्महत्येपूर्वी वसंताने त्याच्या मुलाकडून लिहून घेतली होती चिठ्ठी

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव (अकोला): येथून जवळ असलेल्या चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येणार्‍या गावंडगाव येथील वसंता कान्हू राठोड या ३0 वर्षीय तरूण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणास कंटाळून  १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

वसंता राठोड याच्यावर बँकेचे तसेच सावकाराचे कर्ज होते. त्याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने ती अनेक दिवसांपासून वेगळी राहत होती. पत्नीअभावी घराची,मुलांची चिंता व त्यातच कर्जबाजारीपणा या विवंचनेत कंटाळून अखेर त्याने १२ जानेवारी रोजी सकाळी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पश्‍चात आरती (५ वर्षे) आणि आतिष (७ वर्षे) अशी दोन मुले आहेत. मृतक वसंताने आत्महत्येपूर्वी त्याच्या मुलाकडून चिठ्ठी लिहून घेतली होती. चिठ्ठीमध्ये मृतकाच्या आत्महत्येनंतर त्याचा मुलांचा सांभाळ शासनाने करावा, असे लिहिले आहे. वसता राठोडने मुलाकडून लिहून घेतलेली चिठ्ठी मुलाकडे देऊन नंतर गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. चान्नी पोलिसांना या घटनेबाबत माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनसाठी पाठवून दिला. पण आता वसंता राठोडच्या मुलांचा सांभाळ करणार कोण, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे.  पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणfarmer suicideशेतकरी आत्महत्या