शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : बाळापूर तालुक्यातील लोहार्‍यात एसटी बसवर दगडफेक; चार प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:38 IST

लोहारा (बाळापूर): कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलसदृश परिस्थितीचे पडसाद २  जानेवारी रोजी बाळापूर तालुक्यातील लोहारा येथेही उमटले. संतप्त जमावाने बसवर  दगडफेक केल्याने यातील चार प्रवासी जखमी झाले, तसेच बसच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देकोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचे पडसादपोलिसांनी चौकशीसाठी घेतले चौघांना ताब्यातसुरक्षेसाठी ‘एसआरपी’ची अतिरिक्त कुमक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा (बाळापूर): कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलसदृश परिस्थितीचे पडसाद २  जानेवारी रोजी बाळापूर तालुक्यातील लोहारा येथेही उमटले. संतप्त जमावाने बसवर  दगडफेक केल्याने यातील चार प्रवासी जखमी झाले, तसेच बसच्या काचा फुटल्याने  मोठे नुकसान झाले. या दगडफेकीत बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले  आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी व उरळचे ठाणेदार  यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना चौकशीसाठी  ताब्यात घेतले. 

औरंगाबादवरून परतवाडा येथे जाणारी बस क्र. एमएच ४0 एक्यू ६२७६ लोहारा  फाट्यावर येताच ३0 ते ३५ जणांच्या जमावाने बसवर दगडफेक केली.  बसचालक अशोक लाखेकर यांनी प्रसंगावधान राखत वरिष्ठांना घटनेची माहिती दिली.  काही क्षणातच उरळचे ठाणेदार सोमनाथ पवार ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.  पोलिसांना पाहताच दगडफेक करणार्‍यांनी पळ काढला. घटनेचे गांभीर्य पाहता गावात  ‘एसआरपी’ची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. तसेच बाळापूरचे उ पविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. या  दगडफेकीत बसमधील ३५ प्रवाशांपैकी चार गंभीर जखमी झाले, तर काही किरकोळ  जखमी झाले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमींमध्ये लता  अनिल बनकर (२७), ओम अनिल बनकर (७) रा. अकोट, मारोती तुकडाजी बागड  (७0) रा. चांदूर बाजार यांचा समावेश आहे. गंभीर जखमींवर तत्काळ लोहारा उ पकेंद्रात डॉ. सुनील चहाकर यांनी उपचार सुरू केले. पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू  केली असून, गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

शेगाव आगारचे असहकार्य लोहारा गावाजवळ घडलेल्या या घटनेची माहिती शेगाव आगाराच्या अधिकार्‍यांना  देण्यात आली; मात्र एवढी मोठी घटना होऊनही आगाराचे अधिकारी घटनास्थळावर  पोहोचले नाही. प्रवासी दगडफेकीनंतर मदतीची याचना करीत असताना त्यांना बराच वेळ  मदतच मिळाली नाही, तसेच दुसरी बसही वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रवाशांनी  आगाराविषयी रोष व्यक्त केला.  

टॅग्स :BalapurबाळापूरBhima-koregaonभीमा-कोरेगाव