शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीसाठी अकोला एसटी विभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:09 IST

अकोला : आगामी १२ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचे विठ्ठल दर्शन सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागाच्यावतीने १७० बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अकोला : आगामी १२ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचे विठ्ठल दर्शन सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागाच्यावतीने १७० बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बसगाड्या ८ ते १९ जुलै २०१९ दरम्यान धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात्रा कालावधीदरम्यान जिल्हा ठिकाणी यात्रा प्रतीक्षालयांसह प्रवाशांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. पंढरपूर यात्रा बैठक आढाव्यात ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय मागणी आल्यास ग्रामीण भागात अतिरिक्त गाड्या सोडण्याचीदेखील तयारी विभागांची आहे.राज्य परिवहन महामंडळ दरवर्षी आषाढीनिमित्त वारकऱ्यांची ने-आण करीत असते. त्यामुळे आषाढी-जुलै महिना हा गर्दीचा काळ ठरलेला असतो. १२ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त महामंडळाने ८ ते १९ जुलै दरम्यान पंढरपूर गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जर एकाच गावातून मोठ्या संख्येत वारकरी पंढरपूरकडे जाण्यास इच्छुक असतील, तर त्यांच्यासाठी स्पेशल बसगाडी पाठविण्याची तयारीदेखील विभागाची आहे. शिवाय, दर्शनानंतर गावाकडे परतणाºया प्रवाशांसाठी विशेष आरक्षणाची सोयही करण्यात आली आहे. शिवशाही आणि शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात ३० ते ४५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. गेल्यावर्षी अकोला विभागाने २१८ बसफेरी करून २ लाख ११ हजार किमीचा टप्पा गाठून ६५ लाख ६४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. यंदा यापेक्षा जास्त उत्पन्न मिळविण्याचा उद्देश विभागाचा आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटीPandharpur Wariपंढरपूर वारी