शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : म्हैसांग-अकोला मार्गावर वाळूचा अवैध उपसा करणारे सहा ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 22:57 IST

अकोला : म्हैसांग ते अकोला या मार्गावर वाळूचा अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करणार्‍या चार ट्रक व दोन ट्रॅक्टरवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी घुसर ते अकोट फैलदरम्यान पाळत ठेवून कारवाई केली.

ठळक मुद्देचोरीचा गुन्हा दाखलविशेष पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : म्हैसांग ते अकोला या मार्गावर वाळूचा अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करणार्‍या चार ट्रक व दोन ट्रॅक्टरवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी घुसर ते अकोट फैलदरम्यान पाळत ठेवून कारवाई केली. ही सहा वाहने जप्त केली असून, तब्बल २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मोठी उमरी येथील रहिवासी मनीष गिरी, सतीश सुळे, गणेश गंगागीर गिरी यांच्या मालकीच्या एमएच ३0 एबी ९६0२ आणि एमएच ३0 एएन ९७४९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने योगेश नागोराव बोपटे रा. आपातापा व प्रकाश चिंतामण वानखडे हे दोघे ट्रॅक्टरचालक वाळूची चोरी करून ती अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी दोन्ही ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतले, तसेच दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले असून, सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर लहान उमरीतील रहिवासी सुभाष गावंडे याच्या मालकीच्या एमएच ३0 एल ४८७२ क्रमांकाच्या ट्रकने हबीब शाह अकबर शाह मदारी, अमीन लोदी याच्या मालकीच्या एमएच ३0 एबी १0५८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरत चंद्रकांत नाचरू आणि पाचमोरीतील रहिवासी आरीफ भाई याच्या एमएच ३४ ए ६९१८ क्रमांकाच्या तसेच एमएच व्ही ७३७७ क्रमांकाच्या ट्रकमधून प्रमोद अशोक वदे आणि दीपक मंगल बदराशे हे वाळूची अवैधरीत्या उपसा करून चोरी करीत असल्याचे अळसपुरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पथकासह घुसर ते अकोट फैलदरम्यान पाळत ठेवून चार ट्रक आणि ट्रॅक्टर जप्त केला. तब्बल २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सदर आरोपींविरुद्ध कलम ३७९, २८७ नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व पथकाने केली. या प्रकरणातील १३ पैकी ७ आरोपींना  अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हा