शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अकोला ‘सिकलसेल’ रुग्णांचे रेड झोन; रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:48 IST

अकोला : जिल्ह्यात ‘सिकलसेल’च्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. तीन वर्षांत सिकलसेलच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अकोला जिल्हा सिकलसेल रुग्णांच्या रेड झोनमध्ये आला आहे.

ठळक मुद्दे २०१० पर्यंत अकोला जिल्ह्यात सिकलसेलच्या रुग्णांची संख्या केवळ तीन हजारांच्या आत होती. आता ही संख्या २५ हजारांच्या घरात पोहोचल्याने अकोला जिल्हा सिकलसेलच्या रेड झोनमध्ये आला आहे.या आजाराच्या रुग्णांचे वय हे २० ते ३० वर्षांनी घटत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

- सचिन राऊतअकोला : जिल्ह्यात ‘सिकलसेल’च्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. तीन वर्षांत सिकलसेलच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अकोला जिल्हा सिकलसेल रुग्णांच्या रेड झोनमध्ये आला आहे. अकोला जिल्ह्यासाठी ही चिंताजनक बाब असून, आरोग्य विभागाने नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.आई-वडिलांपासून होणारा तसेच आनुवंशिक आजार म्हणून सिकलसेल आजाराची ओळख आहे. सिकलसेल या आजारामुळे रुग्णांच्या शरीरातील रक्तपेशी झपाट्याने तसेच प्रचंड प्रमाणात कमी होतात. रुग्णाच्या शरीरातील रक्तपेशी एका महिन्याच्या कालावधीत पूर्णत: संपण्याच्या मार्गावर असतात, त्यामुळे या गंभीर प्रकाराचा रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. २०१० पर्यंत अकोला जिल्ह्यात सिकलसेलच्या रुग्णांची संख्या केवळ तीन हजारांच्या आत होती; मात्र आता ही संख्या २५ हजारांच्या घरात पोहोचल्याने अकोला जिल्हा सिकलसेलच्या रेड झोनमध्ये आला आहे. दोन वर्षांपूर्वी सिकलसेल रुग्णांची संख्या ११ हजार २२२ एवढी होती. आता तब्बल २५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. सिकलसेल रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात चार रुग्णालयांमध्ये यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सिकलसेलचे रुग्ण वाढले, त्यासाठी आरोग्य विभागाने चार ठिकाणी इलेक्ट्रोफोरेसिस यंत्र बसविण्यात आले असून, हे यंत्र हाताळण्यासाठी तज्ज्ञ तंत्रज्ञांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या यंत्राच्या उपचार पद्धतीमुळे अकोला जिल्ह्यातील रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे; मात्र सिकलसेल रुग्णांची वाढत असलेली संख्या जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. शासन स्तरावरून सिकलसेलच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत; मात्र आनुवंशिक आजार असलेल्या सिकलसेलवर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला प्रचंड कसरत करावी लागत आहे. चार रुग्णालयांमध्ये उपचारअकोला शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय व अकोट येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णालयांमध्ये सिकलसेलच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सिकलसेल हा आजार गंभीर आहे. आई-वडिलांपासून आजोबा, पणजोबांपासून होणारा हा आजार आनुवंशिक आहे. या आजारामुळे रुग्णांची वयोमर्यादा केवळ ४५ ते ४८ वर्षे एवढीच राहते. रुग्णांच्या शरीरातील रक्तपेशी दर महिन्याला प्रचंड प्रमाणात कमी होत असल्याने या आजाराच्या रुग्णांचे वय हे २० ते ३० वर्षांनी घटत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य